August 8, 2025

महात्मा बसवेश्वर महाविद्यालयात शेख आरिफ मलीक याचा सत्कार संपन्न

  • लातूर (दिलीप आदमाने ) –
    श्री महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्था, लातूर द्वारा संचलित महात्मा बसवेश्वर महाविद्यालयाच्या प्राचार्य कक्षामध्ये शेख आरिफ मलिक याचा महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.संजय गवई यांनी स्मृतिचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
    यावेळी कार्यालय प्रमुख नामदेव बेंदरगे यांची उपस्थिती होती,
    दि. १६ जून २०२२ पासून भारत सरकार मार्फत भारतीय सैन्य दला भरतीची प्रक्रिया अग्निवीर योजनेतर्गत सुरू झाली. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे युवकांना रोजगार उपलब्ध करून देणे, युवकांना सशक्त आणि मजबूत बनविणे, युवकांमधील बेरोजगारी कमी करणे, त्यांचा आत्मविश्वास वाढवणे आणि प्रशासना विषयी जाणीवजागृती निर्माण करणे हा आहे.
    अग्नीवीर सैन्य भरतीमध्ये महात्मा बसवेश्वर महाविद्यालयातील कला शाखेतील बारावी उत्तीर्ण विद्यार्थी शेख आरिफ मलीक याने पुणे येथे लेखी परीक्षा, शारीरिक चाचणी आणि वैद्यकीय चाचणी सुद्धा दिली असून ३० एप्रिल नंतर त्याचे गोवा येथे सहा महीने प्रशिक्षण होणार आहे. त्याचे आई-वडील बोरवटी येथे राहत असून ते शेतमजुरी करतात तर भाऊ महात्मा बसवेश्वर महाविद्यालयांमधील बी. ए. प्रथम वर्षाला शिकत आहे.
    त्याने मिळवलेल्या या उज्वल यशाबद्दल महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, सचिव आणि इतर सर्व पदाधिकारी, उपप्राचार्य, पर्यवेक्षक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक यांनी अभिनंदन करून त्याला पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
error: Content is protected !!