गोविंदपुर (अविनाश सावंत ) – कळंब तालुक्यातील गोविंदपूर गावांत महायुतीच्या उमेदवार आर्चनाताई पाटील यांनी भेट देऊन मतदारांशी संवाद साधला.केंद्राकडून निधी खेचून आणण्यासाठी आपल्या लोकसभा मतदारसंघाचा खासदार हा महायुतीचाच असायला हवा. असे मत अर्चनाताई पाटील यांनी यावेळी जनतेला पटवून सांगितले.कोरोना काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले कार्य आपण विसरता कामा नये. आजही लोकांना मोफत अन्नधान्य मिळत आहे. हे केवळ मोदी मुळेच शक्य आहे. येत्या काळात ते आणखी क्रांतीकारी निर्णय घेणार आहेत. त्यामुळे त्यांचे हात बळकट करण्यासाठी घड्याळ चिन्हासमोरील बटन दाबून मोठ्या मताधिक्याने विजयी करावे असे आवाहन आर्चना पाटील यांनी केले. यावेळी महायुतीचे पदाधिकारी वैभव मुंडे, अनिल मुंडे, आश्रुबा मुंडे,सरपंच आशोक मस्के, उपसरपंच सतोष मुंडे, तसेच कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले