लातूर (दिलीप आदमाने) – डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे येथील संशोधन विभागामार्फत संशोधन तज्ञ परिषद गठित करण्यात आली आहे.या परिषदेच्या मार्गदर्शकपदी ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य डॉ.सुरेश वाघमारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या ते बार्टीच्या अभ्यास गटावर कार्यरत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे ही संस्था महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीच्या संदर्भात संशोधन करून अभ्यासपूर्ण मांडणीद्वारा शासनास अहवालाद्वारे धोरणात्मक शिफारशी करते. अनुसूचित जातीच्या संदर्भात सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, सांस्कृतिक तसेच मानववंशशास्त्रीय पैलूवर सातत्याने संशोधन करत असते. या संशोधनाच्या प्रवासात अनेक टप्प्यावर संशोधकाची तसेच तज्ञ मार्गदर्शकाची गरज पडते. या अनुषंगाने तज्ञ व्यक्तीची “संशोधन परिषद” गठित करण्यात आली आहे. या परिषदेच्या मार्गदर्शकपदी म्हणून प्राचार्य डॉ. सुरेश वाघमारे याची निवड केल्याचे पत्र महासंचालक सुनील वारे यांनी देवून अभिनंदन केले आहे. त्याच्या या निवडीबद्दल डॉ. नारायण कांबळे, डॉ. प्रदीप आगलावे, ॲड.मंचकराव डोणे, डॉ.बाळासाहेब गोडबोले, प्राचार्य डॉ.संजय गवई, डॉ.विनोद जाधव आणि डॉ.राम किशन मांजरे यांनी अभिनंदन करून पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.
More Stories
त्याग,समर्पण आणि प्रेरणेचा जागर;माता रमाई जयंती उत्साहात साजरी
आई-वडिलांमुळेच आपल्या अस्तित्वाची ओळख –डॉ.सुनील गायकवाड
खरोसा लेणी येथे माघ पौर्णिमा उत्सव उत्साहात साजरा;६५ धम्म अनुयायांचा सहभाग