August 9, 2025

परंडा येथे भुईकोट किल्लाची साफ-सफाई

  • उस्मानाबाद(जिमाका) -महात्मा गांधीच्या 154 व्या जयंती रोजी छत्रपती शिव राज्यभिषेकास 350 वर्ष पुर्ण होत असल्याने छत्रपती शिवरायाना मानवंदना देण्‍यासाठी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था परंडा येथील 60 प्रशिक्षणार्थ्यांनी प्रार्चाय एस.एस.कदम आणि सर्व कर्मचारी वंदासह परंडा येथील भुईकोट किल्लाची सकाळी 9 ते 11.30 वाजेपर्यंत साफ-सफाई केली.कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन शिव वंदना म्हणण्यात आली.
    यावेळी प्रशिक्षणार्थ्यांने नृसिंह मंदिर परिसर आणि कोर्ट महल परिसर व किल्ल्याची असलेल्या तोफा जवळ वाढलेली झाडे झुडपे काढुन स्वच्छता केली. राजा शिव छत्रपती परिवाराचे बाळराजे देशमुख यांनी कल्ला संवर्धनाचे महत्व विषद केले.
    यावेळी प्राचार्य एस.एस.कदम,वाय.एस.शेरताटे, एस.के उपाध्ये, जी.ए खराडे, श्रीमती एम.पी.काळे तसेच बाळराजे देशमुख, संदीप ढवळे तसेच धाराशिव जिल्हा पर्यटन विकास समितीचे विकास कुलकर्णी हे उपस्थित होते.
error: Content is protected !!