कळंब ( महेश फाटक ) –व्हाईस ऑफ मीडिया कळंब तालुक्याच्या वतीने पत्रकार रवी केसकर यांच्या वरील हल्ल्याचा तीव्र निषेध करून आरोपीला तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी व्हाईस ऑफ मीडिया कळंब तालुक्याच्या वतीने करण्यात आली. धाराशिव जिल्हा पत्रकार संघांचे विश्वस्त रवी केसकर यांचे अपहरण करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला.केसकर काम आटोपून घरी जात असताना अज्ञात हल्लेखोरांनी त्यांना अमर पॅलेस ते साळुंखे नगर बेंबळी रोड या भागात मारहाण केली. चाकू हल्ल्यात त्यांच्या चेहऱ्याला जखम झाली आहे. केसकर या हल्ल्यातुन बालंबाल बचावले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरु केला असला तरी तात्काळ आरोपीला अटक करण्यात यावी, या मागणीचे निवेदन कळंब तहसीलदार यांना देण्यात आले.या निवेदनावर व्हाईस ऑफ मीडिया कळंब तालुका अध्यक्ष रणजित गवळी,शिवप्रसाद बियाणी,रामराजे जगताप, अशोक कुलकर्णी,सुनील गाडे,राजेंद्र बारगुले,महेश(नाना)फाटक, सलमान मुल्ला,सिकंदर पठाण, परमेश्वर खडबडे,आश्रुबा घुले आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले