August 8, 2025

सहकार विभागातील सेवानिवृत्त अधिकाऱ्यांकडून पॅनलसाठी नावे मागविली

  • धाराशिव (जिमाका) – महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ८३ व ८८ अन्वये चौकशी / प्राधिकृत अधिकारी यांची नामतालिका (पॅनल) तयार करण्यासाठी अर्ज सहकार खात्यातून निवृत्त झालेल्या अधिकारी (वयाची 70 वर्ष पुर्ण न झालेल्या), निवृत्त न्यायाधीश, वकील,चार्टर्ड अकोटंट यांचेकडून मागविण्यात येत आहेत.
    अर्जाचे विहित नमूने विभागीय सहनिबंधक,सहकारी संस्था,लातूर विभाग लातूर मध्यवर्ती प्रशासकीय इमारत,दुसरा मजला,लातूर,जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था लातूर,धाराशिव,बीड,नांदेड व संबंधीत जिल्ह्यातील सर्व जिल्हा उपनिबंधक व सहाय्यक निबंधक,सहकारी संस्था यांचे कार्यालयात १ ते ३० एप्रिल या कालावधीत कार्यालयीन वेळेत मिळू शकतील.भरलेले परिपुर्ण अर्ज आवश्यक त्या कागदपत्रासह वरील कालावधीत संबंधीत कार्यालयात सादर करण्यात यावीत.
    याबाबतची जाहीर सूचना वरील नमुद कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.विभागीय सहनिबंधक,सहकारी संस्था,लातूर यांनी कळविले आहे.
error: Content is protected !!