कळंब (जयनारायण दरक) – तालुक्यातील जवळा (खुर्द) येथील हातलाई शुगर प्रायव्हेट लिमिटेड या आपल्या गुळ पावडर कारखान्याचा पहिला गळीत हंगामा व मोळी पुंजन सोहळा छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९४ व्या जयंतीनिमित्ताने पार पडला होता. या गळीत हंगामातील पहिली पावडर काल रात्री कारखान्यातून बाहेर पडत असल्याचा मोठा आनंद आहे. चेअरमन अभिराम पाटील व आदित्य पाटील यांनी पहिल्या गुळ पावडर पोत्याचे पूजन केले. आपल्या कारखान्यातील या पहिल्या पावडरचा आनंद वेगळा आहे. युगांडा देशाच्या व्यापार सहकार मंत्री नतबाजी हेरियट व कोलंबियाचे व्यापारी सल्लागार जी. मोहनराव आणि अजंठा फार्म लिमिटेड सल्लागार मधुसूदन अग्रवाल यांच्या हस्ते शुभारंभ होऊन हा गळीत हंगामा पार पडला होता. काल या हंगामातील पहिली पावडर बाहेर पडली. हातलाई शुगरच्या आणि युगांडा सरकार यांच्यासोबत झालेल्या निर्यातीच्या करारातून या क्षेत्राला फायदा होणार आहे. या शुगर्स कंपनीमुळे तरुणाईला रोजगार मिळाला असून शेतकऱ्यांच्या उसाला हक्काचा कारखाना ही मिळाला आहे. त्यामुळेच या पहिल्या पावडर पोत्याचा आनंद हा संपूर्ण पाटील कुटुंबासह परिसरातील शेतकऱ्यांनाही आहे. युगांडाच्या सहकार मंत्री हेरिपट यांनीही आपल्या भाषणातून हातलाई शुगर च्या माध्यमातून या क्षेत्रातील शेतकऱ्यांना उत्पन्नात वाढ तर होईलच. पण त्यासोबत रोजगाराची संधी या भागातील तरुणांना उपलब्ध होईल, आमच्या देशाबरोबर झालेल्या निर्यातीमुळे या क्षेत्राला ऊर्जितावस्था प्राप्त होईल असे मत व्यक्त केले होते. त्यांच्या या विचारांना आता खरी सुरुवात झाली आहे. हातलाई शुगरचे चेअरमन अभिराम पाटील यांनी यावेळी आनंद व्यक्त करत या उत्पादक प्रक्रिया आणि कारखान्याच्या माध्यमातून परिसरातील बळीराजाचं जीवन सुखमय करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे म्हटले. तसेच गळीत हंगामातील मोळी पूजन ते पोतेपुजन पर्यंतच्या प्रक्रियेत साथ, सोबत देणाऱ्या आणि कष्ट घेणाऱ्या सर्वांचे आभारी मानले. याप्रसंगी शितल गायकवाड, मुंडे चीप इंजीनियर, रितापुरे चीफ केमिस्ट, रशीद खान, ऋषिकेश शिंदे, लोमटे,आबा सिरसाट, शोएब खान, व सर्व कर्मचारी उपस्थित होते
More Stories
“मोठ्या महादेवाचा मार्ग धोक्यात!” — पुरात वाहून गेला रस्ता-पूल; चैत्र एकादशीपूर्वी दुरुस्तीची शिवभक्तांची आर्त मागणी
“रस्ते की मृत्यूचे सापळे?” — अतिक्रमणखोर मोकाट,प्रशासन झोपेत;कळंबमध्ये महिलेचा चिरडून मृत्यू
तात्यासाहेब सोनवणे यांना ‘नेताजी सुभाषचंद्र बोस राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार’”