कळंब (जयनारायण दरक ) – डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संलग्नित कळंब येथील छत्रपती शिवाजी महाविद्यालयात’महिला धोरण अंतर्गत’ शुक्रवार दि.22 मार्च रोजी ‘कराटे प्रशिक्षण शिबीराचे’आयोजन छत्रपती शिवाजी महाविद्यालयात करण्यात आले होते.सकाळी या शिबिराचे उद्घाटन सुरुवातीला राजमाता जिजाऊं व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन कार्यक्रमाध्यक्ष प्राचार्य.शशिकांत जाधवर कराटे प्रशिक्षक कु.वेदांती पारवे व प्रा.सोमनाथ कसबे या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कराटे प्रशिक्षक कु.वेदांती पारवे यानी महाविद्यालयातील मुलींना आपले संरक्षण करण्यासाठी कराटे याचा उपयोग कशा प्रकारे करता येऊ शकतं याविषयी मार्गदर्शन केले. तसेच यावेळी उपस्थित मुलींना कराटेच्या विविध प्रकारचे प्रशिक्षण देण्यात आले.या कार्यक्रमाचे आयोजन जिजाऊ युवती मंच व आयक्युएसी विभाग यानी केले होते.यावेळी अनेक मुलींनी कराटे प्रशिक्षणामध्ये सहभाग नोंदवला.कार्यक्रमाला महाविद्यालयातील विद्यार्थिनीसह एनएससस कार्यक्रमाधिकारी प्रा.ज्योतिराम जाधव प्रा.मनिषा कळसकर तसेच डॉ.विद्युलता पवार,प्रा.सुनिता चोंदे डॉ.अनिल जगताप व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
More Stories
“मोठ्या महादेवाचा मार्ग धोक्यात!” — पुरात वाहून गेला रस्ता-पूल; चैत्र एकादशीपूर्वी दुरुस्तीची शिवभक्तांची आर्त मागणी
“रस्ते की मृत्यूचे सापळे?” — अतिक्रमणखोर मोकाट,प्रशासन झोपेत;कळंबमध्ये महिलेचा चिरडून मृत्यू
तात्यासाहेब सोनवणे यांना ‘नेताजी सुभाषचंद्र बोस राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार’”