February 10, 2026

धाराशिव जिल्हा पोलीसनामा

  • “मोटार वाहन कायद्यांतर्गत कारवाई.”
  • धाराशिव शहर वाहतुक शाखा व संबंधीत पोलीस ठाण्यांनी महत्त्वाच्या रस्त्यांवर दि.22 मार्च रोजी मोटार वाहन कायदा- नियम भंग प्रकरणी एकुण 239 कारवाया करुन 1,74,550 ₹ ‘तडजोड शुल्क’वसुल केले आहे.
  • “ अवैध मद्य विरोधी कारवाई.”
  • धाराशिव ग्रामीण पोठाच्या पथकास आरोपी नामे-1)शाम राजेंद्र कुंभार, वय 35 वर्षे, रा. येडशी ता. जि. धाराशिव हे दि.22.03.2024 रोजी 18.30 वा. सु. आळणी शिवारत टोल नाका शेजारी हॉटेल जगदंबाचे बाजूस अंदाजे 2,065 ₹किमतीच्या देशी विदेशी दारुच्या 59 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये धाराशिव ग्रामीण पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
  • लोहारा पोठाच्या पथकास आरोपी नामे-1)संदीप राजेंद्र रवळे, वय 25 वर्षे, 2) शेखर राजेंद्र रवळे, दोघे रा. कास्ती बु ता. लोहारा जि. धाराशिव हे दि.22.03.2024 रोजी 19.10 वा. सु. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे राज बिअर शॉपी च्या आत अंदाजे 10,250 ₹किमतीच्या देशी विदेशी दारुच्या 41 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये लोहारा पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
  • “ मद्यपी चालकावर गुन्हा दाखल.”
  • नळदुर्ग पोलीस ठाणे : आरोपी नामे-1)सचिन बाबुराव केरुरे, वय 35 वर्षे, रा. भोसगा ता. लोहारा. जि. धाराशिव हे दि.22.03.2024 रोजी 14.30 वा. सु. आपल्या ताब्यातील वाहन कार क्र एमएच 25 एएफ 2522 ही रायबा हॉटेल चे समोर जळकोट येथे रोडवर मद्यधुंद अवस्थेत चालवून मो.वा.का. कलम- 185 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द नळदुर्ग पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
  • कळंब पोलीस ठाणे : आरोपी नामे-1)दिपक दिलीप शिंदे, वय 23 वर्षे, रा. बलवडी ता. सांगोला जि. सोलापूर. हे दि.22.03.2024 रोजी 17.47 वा. सु. आपल्या ताब्यातील टॅकर क्र एमएच 10 डी. टी. 4586 हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक कळंब येथे भरधाव वेगात रोडच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन मद्यधुंद अवस्थेत चालवून भ.दं.वि.सं. 279 सह मो.वा.का. कलम- 185, चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द कळंब पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
  • वाशी पोलीस ठाणे :आरोपी नामे-1)भालचंद्र परसराव जाधव, वय 35 वर्षे, रा. इंदापूर ता. वाशी. जि. धाराशिव हे दि.22.03.2024 रोजी 18.10 वा. सु. आपल्या ताब्यातील वाहन कार क्र एमएच 25 एए 8217 ही वाशी येथील पारा चौक येथे रोडवर मद्यधुंद अवस्थेत चालवून मो.वा.का. कलम- 185 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द वाशी पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
  • येरमाळा पोलीस ठाणे :आरोपी नामे-1)राजकुमार अविनाश शिंदे, वय 27 वर्षे, रा. बावी ता. वाशी जि. धाराशिव हे दि.22.03.2024 रोजी 20.48 वा. सु. आपल्या ताब्यातील वाहन कार क्र एमएच 13 बीसी 8964 ही येरमाळा येथील एनएच 52 रोउवर रत्नापुर पाटी येथे रोडवर मद्यधुंद अवस्थेत चालवून मो.वा.का. कलम- 185 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द येरमाळा पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
  • “रहदारीस धोकादायरीत्या वाहन उभे करणाऱ्यावर गुन्हा नोंद.”
  • धाराशिव ग्रामीण पोलीस ठाणे :आरोपी नामे- अमोल महादेवराव पवार, वय 44 वर्षे, रा. येडशी ता. जि. धाराशिव, हे दि.22.03.2024 रोजी 10.00 वा. सु. आपल्या ताब्यातील टमटम क्र एमएच 25 एम 0977 हा बसस्थानक येडशी समोरील सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायकरीत्या उभे केलेले असताना धाराशिव ग्रामीण पोलीसांना मिळून आले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द भा.द.वि. स. कलम 283 अन्वये धाराशिव ग्रामीण पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे.
  • “ मारहाण.”
  • तामलवाडी पोलीस ठाणे :आरोपी नामे-1)निजाम गयासोद्दीन शेख, 2) गयसोद्दीन शेख, 3) हैदर मुसा शेख सर्व रा. तामलवाडी ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.20.03.2024 रोजी 18.00 वा. सु. तामलवाडी येथे बोगद्याखाली व आत्माशांत हॉटेल जवळ रोडवर फिर्यादी नामे- रमेश शंकर उबाळे, वय 58 वर्षे, रा. होनसळ ता. उत्तर सोलापूर जि. सोलापूर यांना व नमुद आरोपींनी मोटरसायकलचा धक्का लागल्याचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, काठीने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-रमेश उबाळे यांनी दि.22.03.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तामलवाडी पो. ठाणे येथे 324,323, 504, 506, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • “ मालमत्तेविरुध्द गुन्हे.”
  • मुरुम पोलीस ठाणे : दि. 21.03.2024 रोजी 23.00 ते दि. 22.03.2024 रोजी 06.00 वा. सु. आष्टा कासार येथील जिल्हा परिषद शाळाचे कुलूप अज्ञात व्यक्तीने कुलूप तोडून आत प्रवेश करुनएक लॅपटॉप, ब्रदर प्रिंटर, एलईडी टि व्ही. गॅस सिलेंडर, टुल्स किट, जर्मनचे पतले असा एकुण 43,200₹ किंमतीचा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- एकनाथ नरसोबा शिंदे, वय 49 वर्षे, मुख्याध्यापक जिल्हा परिषद शाळा आष्टा कासार ता. लोहारा जि. धाराशिव यांनी दि.22.03.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन मुरुम पो. ठाणे येथे 461, 380 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • नळदुर्ग पोलीस ठाणे :फिर्यादी नामे- वसीम अहेमद हुसन कुरेशी, वय 36 वर्ष, रा. व्यास नगर नळदुर्ग ता. तुळजापूर जि. धाराशिव यांचा अंदाजे 40,000 ₹ किंमतीचा वन प्लस 10 टी कंपनीचा मोबाईल फोन हा दि. 24.01.2024 रोजी 19.00 वा. सु. लक्ष्मीण्‍ चौक होर्टी येथुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- वसीम कुरेशी यांनी दि.22.03.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो. ठाणे येथे 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • वाशी पोलीस ठाणे :दि. 27.02.2024 रोजी 02.55 वा. पुर्वी यशवंडी शिवारातील रिनीव पॉवर कंपनीचे पॉईट नं 348 प्लॅटवर पवन चक्कीचे आतमधील केबल वायर अंदाजे 5,07,000 ₹ चा अज्ञात व्यक्तीने माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-अमोल अश्रुबा मोटे, वय 39 वर्षे, व्यवसाय खाजगी नोकरी सिक्युरीटी गार्ड रा. गिरवली ता. भुम जि. धाराशिव यांनी दि.22.03.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन वाशी पो. ठाणे येथे 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • “ फसवणुक.”
  • नळदुर्ग पोलीस ठाणे : आरोपी नामे-सुभाष हारिबा भोसले, वय 65 वर्षे, 2) पदमाकर श्रीपती भोसले, वय 45 वर्षे, दोघे रा. गंधोरा ता. तुळजापूर, 3) श्री.एस.एन पांचाळ, वय 55 वर्षे, तत्कालीन ग्रामसेवक गंधोरा सध्या पंचायत समिती उमरगा ता. उमरगा, 4) आरुणा दत्ता कुलकर्णी तलाठी गंधोरा सध्या रा. पेशवे हॉस्पिटल शेजारी हाडको तुळजापूर ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी फिर्यादीची बहिण नमे- मनिषा महेश गवळी हिचा विवाह गंधोरा येथील महेश सुभाष गवळी(भोसले) याचे सोबत झाला होता. महेश हा अपघातात मयत झाल्याने नमुद आरोपींनी त्याचे खोटे बनावट मृत्यु प्रमाणपत्र व वारस प्रमाणपत्र तयार करुन त्यांचे नावावरील जमीन गट नं 96 पैकी 85 आर शेती यास वारस लावण्याकरीता बनावट दस्तऐवज तयार फेरफार क्र 2596 हा बेकायदेशीर रित्या मंजूर करुन फिर्यादीची बहिण मनिषा भोसले यांची फसवणुक करुन आर्थिक नुकसान केले. अशा मजकुराच्या मा. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी तुळजापूर यांचे आदेश क्र फौ.प्र.सं. 156(3) प्रमाणे फिर्यादी नामे-आनंदा शिंदे, वय 48 वर्षे, रा. येवती ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.22.03.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो. ठाणे येथे 409, 420, 467, 167, 468, 474, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • “ बलादग्रहण.”
  • आनंदनगर पोलीस ठाणे : आरोपी नामे- विवेक विनायक निंबाळकर, 2) आकाश गायकवाड इतर दोन इसम यांनी दि.25.01.2024 रोजी 13.30 ते दि. 22.03.2024 रोजी 01.30 वा. सु. समता नगर मेन रोड वर धाराशिव येथे फिर्यादी नामे- मच्छिंद्र चंदर तुंदारे, वय 46 वर्षे, रा. सिध्देश्वर बाजार, मेन रोड समता नगर धाराशिव यांना नमुद आरोपींनी जातीवाचक श्विीगाळ करुन किरणा मालाचे गोडावून पेटवून देण्याची धमकी देवून जाळात फेकून देण्याचा धाक दाखवून दि. 21.03.2024 रोजी 22.00 ते दि. 22.03.2024 रोजी 01.30 वा. सु. किरणा मालाचे गोडावून विस्तवाने पेटवून देवून दुकानाचे व मेडीकल जाळून मच्छिंद्र तुंदारे यांचे अंदाजे 5,00,000₹ चे नुकसान केले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- मच्छिंद्र तुंदारे यांनी दि.22.03.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो. ठाणे येथे 436, 384, 504, 506, 34 भा.दं.वि.सं. सह अ.जा.ज.अ.प्र कायदा कलम 3(1) (आर)(एस) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • “ रस्ता अपघात.”
  • उमरगा पोलीस ठाणे : फिर्यादी नामे- सतिश काशीनाथ पाटील, वय 52 वर्षे, सोबत त्यांचे पत्नी मयत नामे- संगीता उर्फ मंगल सतिश पाटील रा. बोरगाव (तुपाची) ता. तुळजापूर जि. धाराशिव हे दोघे दि.16.03.2024 रोजी 08.45 वा. सु. लुना मोटारसायकल क्र एमएच 25 एव्ही 7053 वरुन मुळज येथे जात असताना येळी गावाचे पुढे एक किमी अंतरावर एनएच 65 रोडवर मोटरसायकल क्र केएस 32 ईआर 5032 चा चालकाने त्याचे ताब्यातील मोटरसायकल ही हायगई व निष्काळजीपणे चालवून सतिश पाटील यांचे मोटरसायकलला पाठीमागून धडक दिली. या अपघातात संगीता पाटील या गंभीर जखमी होवून मयत झाल्या. नमुद मोटरसायकल चालक हा अपघात स्थळावरुन वाहनासह पसार झाला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- सतिश पाटील यांनी दि.22.03.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम-279, 337, 338, 304(अ) सह 184, 134 (अ) (ब) मोवाका अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • ढोकी पोलीस ठाणे : मयत नामे- शितल उर्फ मुन्ना अदिनाथ जाधव, वय 48 वर्षे, रा. मारवाड गल्ली ढोकी ता. जि. धाराशिव हे दि.21.03.2024 रोजी 16.15 वा. सु. मोटारसायकल क्र एमएच 25 झेड 4184 वरुन बसून पेट्रोलपंपातुन बाहेर ढोकीकडे जाण्याकरीता थांबला असता नृसिंह पेट्रोलपंप ढोकी समोर बस क्र एमएच 20 बीएल 2631 चा चालक नामे- महादेव जोतीराम नरवडे धाराशिव डोपो यांनी त्याचे ताब्यातील बस ही हायगई व निष्काळजीपणे चालवून शितल उर्फ मुन्ना जाधव यांचे मोटरसायकलला रॉगसाईडने धडक दिली. या अपघातात शितल उर्फ मुन्ना जाधव हे गंभीर जखमी होवून मयत झाले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- संजु अदिनाथ जाधव, वय 46 वर्षे, रा. मारवाड गल्ली ढोकी ता. जि. धाराशिव यांनी दि.22.03.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम-279, 304(अ) सह 184 मोवाका अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • “गोवंशीय जनावरांची कत्तलीकरीता वाहतुक करणाऱ्या विरुध्द परंडा पोलीसठाण्याची कारवाई.”
  • दिनांक 21.03.2024 रोजी 22.00 वा. सु. परंडा पोलीस ठाण्याचे पोलीस उप निरीक्षक किरण घोंगडे यांना गुप्त बातमीदारमार्फत माहिती मिळाली की, परंडा येथील दर्गा रोड येथुन भिमनगर कडे जाणारे रोडवर एक पिकअप वाहन उभे आहे अशी खात्रीलायक बातमी मिळाल्यावरुन परंडा पोलीस ठाण्याचे पथकाने लागलीच त्याठिकाणी जावून चेक केले असता सदरील वाहनांमध्ये गोवंशीय जनावरांची कत्तलीसाठी वाहतुक करण्यात येत असल्याचे दिसून आले. सदरील वाहनाचे निरीक्षण केले असता वाहनांमध्ये अत्यंत दाटीवाटीने गोवंशीय जनावरे भरले असल्याचे निदर्शनास आले. नमुद पिकअप मधील 16 वासरे असा एकुण 48,000 ₹ किंमतीचे गोवंशीय वासरे सह पिकअप वाहन असा एकुण 5,00,000 ₹ किंमतीचे जनावरे व वाहन मिळून आले. सदरील वासरांना वाहनांमध्ये अत्यंत दाटीवाटीने भरण्यात आले होते. या वासरांना गाडीमध्ये हालचाल करण्यासाठी पर्याप्त जागा नव्हती. अत्यंत त्रासदायक पध्दतीने त्यांची वाहतुक करण्यात येत होती. त्यावरुन पोलीस ठाणे परंडा येथे गुन्हा नोंदणी क्रमांक 62/2024 प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम कलम 11(ए)(डी) (ई) (एच), महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1995 चे कलम 5(अ), 6, 9, 9(अ) अन्वये गुन्हा नोदंवला आहे.
  • सदरची कामगीरी मा. पोलीस अधीक्षक, श्री. अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. गौहर हसन, यांच्या मार्गदर्शनाखाली परंडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री विनोद इज्जपवार, पोलीस उप निरीक्षक श्री. घोंगडे, पोलीस हावलदार शेख, महिला पोलीस हावलदार पायाळे, पोलीस नाईक गुंडाळे, पोलीस अंमलदार- सुर्यजीत जगदाळे, गायकवाड यांचे पथकांनी केली आहे.
  • जनसंपर्क विभाग धाराशिव पोलीस
error: Content is protected !!