March 27, 2026

क्रांतिकारक भगतसिंग,सुखदेव आणि राजगुरू यांना विनम्र अभिवादन

  • लातूर (साक्षी पावनज्योत वृत्तसेवा ) – भारताला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले. भारतीय स्वातंत्र्याचा लढा हा जगभर आदर्शवत ठरला आहे. यामध्ये क्रांतिकारक भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांचे योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण आहे त्यामुळे भारतीयांनी शहिदांच्या कार्य कर्तृत्वाचा विनम्रपणे गौरव केला पाहिजे असे प्रतिपादन गणित विभाग प्रमुख डॉ.सुजित हंडीबाग यांनी व्यक्त केले.
    महाराष्ट्र शासन, महाविद्यालय जयंती उत्सव समिती आणि गणित विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शहीद दिन प्राचार्य कक्षात संपन्न झाला. यावेळी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.
    या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.संजय गवई हे होते तर उपप्राचार्य डॉ. राजकुमार लखादिवे, रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ. मंतोष स्वामी, प्रा. एस. एस. मनियार, प्रा. दीपक धावरे, कार्यालय प्रमुख नामदेव बेंदरगे, विनायक लोमटे, यशपाल ढोरमारे, गोपाळ तिरमले, श्रीशैल्य पाटील आणि योगीराज माकणे यांची उपस्थिती होती.
    सर्वप्रथम क्रांतिकारक भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांच्या प्रतिमेला सर्वांच्या उपस्थितीत पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
    यावेळी नामदेव बेंदरगे बोलताना म्हणाले की, ब्रिटिश सायमन कमिशनचा विरोध करणारे लाला लजपतराय यांचा इंग्रजांनी केलेल्या लाठीचार्जमध्ये मृत्यू झाला. या मृत्यूचा बदला घेण्यासाठी भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांनी निर्णय घेतला. दि. १७ डिसेंबर १९२८ रोजी ब्रिटिश अधिकारी सॉडर्सला गोळ्या घालून त्यांनी ठार केले. त्यावेळी इंग्रजांनी यांना फाशीची शिक्षा सुनावली. दि. २३ मार्च १९३१ रोजी तिघांनाही फाशी देण्यात आली आणि म्हणून आजचा हा दिवस सर्व देशभर शहीद दिन म्हणून साजरा केला जातो असेही ते म्हणाले.
    या कार्यक्रमाचा अध्यक्षिय समारोप प्रभारी प्राचार्य डॉ. संजय गवई यांनी केला आभार प्रा. दीपक धावरे यांनी मानले.
    या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संतोष येचवाड आणि शुभम बिराजदार यांनी परिश्रम घेतले.
error: Content is protected !!