February 9, 2026

पाथर्डी शाळेत महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात साजरी

  • कळंब – तालुक्यातीलजिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाथर्डी येथे दि.२ ऑक्टोबर २०२३ रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.कार्यक्रमाचे प्रस्ताविक मुख्याध्यापक राजेंद्र बिक्कड यांनी केले.या प्रसंगी उपक्रमशिल शिक्षक धनंजय गव्हाणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थांनी भाषणे केली. कार्यक्रमासाठी मा.नानासाहेब पिंगळे सरपंच ग्रामपंचायत पाथर्डी, अर्जुन जाधव माजी सरपंच, श्रीकांत पिंगळे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती , डॉ.संदेश जोशी वैद्यकीय अधिकारी, , शिवदास काका पिंगळे माजी सरपंच, विक्रम सावंत,भरत पिंगळे, राहुल सावंत, अंकुश पिंगळे, रघुनाथ जाधव, शिक्षक वृंद, ग्रामस्थ, विद्यार्थी उपस्थित होते .कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षिका मनिषा पवार, सुरेखा भावले, सरोजिनी पोते यांनी परिश्रम घेतले.सुत्रसंचलन विद्यार्थीनी कु.वैष्णवी पिंगळे व कु.आरोही सावंत यांनी व आभारप्रदर्शन कु.संस्कृती जाधव हिने केले.
error: Content is protected !!