August 9, 2025

माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांची जयंती साजरी

  • भाटशिरपूरा – येथील भाई नारायणराव लोमटे माध्यमिक विद्यालयात भारताचे माजी उपपंतप्रधान व महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत नेते यशवंतराव चव्हाण यांची जयंती साजरी करण्यात आली.
    यावेळी दिवंगत नेते यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.
    यावेळी यशवंतराव चव्हाण यांच्या कार्याची माहिती सहशिक्षक एच ए पानढवळे व मुख्याध्यापक सुरेश टेकाळे यांनी दिली.
    यावेळी कार्यक्रमास शाळेतील सहशिक्षक एस जी सूर्यवंशी, एस एस डिकले, बी व्ही ओव्हाळ, व शिक्षकेतर कर्मचारी विनोद चाळक उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार बी व्हि ओव्हाळ यांनी मानले.
error: Content is protected !!