August 9, 2025

विद्याभवन हायस्कूलमध्ये यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त चित्र ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन

  • कळंब (विशाल पवार) – शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या स्वप्नपूर्तीसाठी ज्ञान प्रसारक मंडळाचे सचिव डॉ.अशोक (दादा) मोहेकर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्याभवन हायस्कूल कळंब या प्रशालेत महाराष्ट्राचे प्रथम मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त यशवंतराव चव्हाण यांच्या चित्रांचे व ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.
    या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्ञान प्रसारक मंडळाचे सचिव तथा प्रशालेचे मुख्याध्यापक पवार व्ही एस यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
    यशवंतराव चव्हाण यांचे चित्र प्रदर्शन व ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी मराठी विभाग प्रमुख पवार एस.जे,एनसीसी विभाग प्रमुख आप्पासाहेब वाघमोडे,ग्रंथपाल प्रशांत गुरव, सहशिक्षिका भाग्यश्री लोमटे, क्रीडा शिक्षक विजयकुमार ढोले,सा.साक्षी पावनज्योत प्रतिनिधी विशाल पवार यांचाही पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
    याप्रसंगी मराठी विभाग प्रमुख उपक्रमशील शिक्षक पवार एस जे यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या सुंदर चित्रांचे व ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन केले होते.विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, विद्यार्थ्यांनी यशवंतराव चव्हाण यांचे कृष्णकाठ,ऋणानुबंध, सह्याद्रीची वारे,युगांतर या साहित्याचे वाचन करावे व इतर साहित्यिकांचेही साहित्य वाचन करावे, वाचनानेच आपण ज्ञान समृद्ध होतो. शालेय वयापासूनच विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी.यशवंतराव चव्हाण हे माणसातलं माणूसपण जपणारे नेते होते. त्यांनी शेती,शिक्षण, व्यापार,सांस्कृतिकता,प्रशासन ,सामाजिक या विविध क्षेत्रात विकास घडवून आणला.अशा या महान नेत्यांच्या जीवन कार्याचा परिचय करून देणारे हे चित्र प्रदर्शन आहे.शालेय विद्यार्थ्यांना यशवंतराव चव्हाण यांच्या कार्याचा परिचय व्हावा या उद्देशाने हे प्रदर्शन घेण्यात आले होते.प्रशालेतील इयत्ता सहावी क चे विद्यार्थी बिरसा उबाळे, पृथ्वीराज धस, अथर्व जाधव ,पवन कोळेकर समर्थ देशपांडे, कृष्णा गोंड , शिंदे समर्थ , क्षीरसागर संकेत , समर्थ ठोंबरे, शिवम कांबळे ,पारखे चैतन्य आयुष पोतदार या विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सक्रिय, उस्फूर्तपणे सहभाग घेतला होता. प्रशालेतील सर्व विद्यार्थीव विद्यार्थिनींनी या उपक्रमात सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पवार एस.जे.यांनी केले तर आभार विजयकुमार ढोले यांनी मानले.
error: Content is protected !!