कळंब (महेश फाटक ) – श्री संत रविदास महाराज जयंती उत्सव 2024 मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी जयंती उत्सव, चर्मकार समाज मेळावा, संत रविदास सभागृह भूमिपूजन व विविध क्षेत्रातील गुणवंतांचा गुणगौरव सोहळा पार पडला. सर्वप्रथम ह.भ.प.ज्ञानेश्वर माऊली पाखरे महाराज आपेगावकार यांचे प्रवचन झाले. त्यानंतर श्री संत रविदास महाराज यांच्या मूर्तीला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालण्यात आला व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.तुळजापूर विधानसभेचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रयत्नातून 10 लाख रूपये सभाग्रहासाठी निधी देण्यात आला.भाजपा तालुकाध्यक्ष अजित पिंगळे यांनी या निधीसाठी विशेष पाठपुरावा करुन निधी मंजूर करुन घेतला.या सभागृहाचे भूमिपूजन कार्यक्रमाचे उद्घाटक माजी जिल्हा परिषद अध्यक्ष नेताजी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्य प्रवक्ते रोहिदास बनसोडे होते. यावेळी प्रमुख पाहुणे माजी आमदार संगीताताई ठोंबरे, राजेंद्र शेरखाने मुख्य संघटक जिल्हा काँग्रेस कमिटी, शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख शिवाजी कापसे, माजी नगराध्यक्ष मुश्ताक खुरेशी, उद्योजक रवी नरहिरे, डी सी सी बँकेचे संचालक संजय कांबळे, संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रा.जालिंदर लोहकरे, विदर्भ प्रमुख संभा वाघमारे, परभणी जिल्हाध्यक्ष मुरलीधर ठोंबरे, लातूर जिल्हाध्यक्ष रवी कुरील, उपाध्यक्ष राज साबळे, अरुण काका चौधरी, महीला जिल्हाध्यक्षा आशा राऊत, मराठवाडा उपाध्यक्ष रामकिसन कांबळे, राजाराम गचांडे, मकरंद पाटील, प्रसिध्द व्याख्याते महादेव खराटे सर, मुख्याध्यापक जाफर पठाण, युवराज पिंगळे, संताजी वीर, घुमरे साहेब, सामाजिक कार्यकर्ते शकील काझी, क्रीडा अधिकारी बनसोडे, संजय होळे, सचिन काळे, दिलीप पाटील, हनुमंत जाधव, ग्रामपंचायत सदस्य हरी कुंभार, शिवाजी गिड्डे, युवराज धाकतोडे, लिडकॉमचे टकले यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे मराठवाडा युवक अध्यक्ष विकास कदम यांनी केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकातून संत रोहिदास महाराज मंदिर उभारणीपासून ते सभागृह भूमिपूजनपर्यंतचा इतिवृत्त सांगितला व संघटनेच्या माध्यमातून समाजाच्या विविध अडचणीवर मात करून समाजासाठी नवी दिशा देण्याचे धोरण राष्ट्रीय अध्यक्ष बबनरावजी घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली करत असल्याचे सांगितले. उद्घाटनपर भाषण करताना माजी जिल्हा परिषद अध्यक्ष नेताजी पाटील यांनी चर्मकार समाजाच्या विकासासाठी व अडीअडचणीत आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सतत मदत करू असे आश्वासन दिले. यानंतर विविध क्षेत्रातील गुणवंतांचा गुणगौरव सोहळा पार पडला.यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये विवेक सुरवसे, प्रियंका कांबळे,आदित्य बोबडे, वैभवी शेवाळे,प्रणव कांबळे, रितेश कांबळे,विनय सुरवसे, चेतन कांबळे, वैष्णवी बोबडे, रोहन शिंदे तर पुरस्कारात आशा सुरवसे – आदर्श शिक्षीका, श्रेयश बनसोडे- युवा उद्योजक, रमेश ठोंबरे- युवा उद्योजक, दीपा कदम- शिक्षक पदी नियुक्ती, कमलाकर शेवाळे- आदर्श शिक्षक, गोकुळ शिंदे- सेवानिवृत्त, राहुल गवळी- युवा उद्योजक, भारत कांबळे- समाजरत्न, राष्ट्रीय चर्मकार महासंघ शाखा मुरुड- उत्कृष्ठ जयंती उत्सव, फ्रेंड्स ग्रुप- अन्नदाता यांचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटच्या सत्रात माजी जिल्हा परिषद उपाध्यक्षा अर्चनाताई पाटील कार्यक्रम स्थळी भेट देऊन चर्मकार समाजाच्या समस्या जाणून घेऊन ‘जिथे कमी तिथे आम्ही’ या उक्तीप्रमाणे सहकार्य व समाजाच्या पुढील वाटचालीसाठी प्रयत्न करणार असे सांगितले. कळंब-धाराशिव विधानसभेचे आमदार कैलास पाटील यांनी संत रविदास महाराज यांचे दर्शन घेऊन रविदास महाराज यांच्या मंदिरासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी पुरुष कमिटीचे अध्यक्ष बाबासाहेब कांबळे, विनोद बेलगावकर, मधुकर माने, अशोक लाड, गोकुळ शिंदे, विलास सुरवसे,विक्रम शेवाळे, बालाजी साबळे, भिकचंद शेवाळे, शिवाजी शिंदे, लिंबराज ठोंबरे, महादेव ठोंबरे,सतीश कदम, रूपचंद लोहकरे, शाम शिंदे, बाबा शिंदे, बाबुराव पाखरे, अभिजीत बोबडे, बाभळगावकर, श्याम शिंदे व महीला कमिटीच्या अध्यक्षा इंदू माने, पुष्पा कदम,सुनीता माने, विजयमाला बोबडे, स्नेहा शिंदे, शैलजा पाखरे, सावित्रीबाई कदम, पुष्पा लोहकरे, भामाताई माने, रोहिणी कदम, सुरेखा लोहकरे, मनीषा लोहकरे, अनुराधा लोहकरे, मनीषा शिंदे, इंदू बेलगावकर, शिल्पा कांबळे, सुरेखा साबळे, विद्या कांबळे, संगीता नेटके यांच्यासह समाजातील समाज बांधव व भगिनी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन काकासाहेब मुंडे यांनी केले.
More Stories
तथागत बुद्ध विहार येथे रमाई जयंती उत्साहात साजरी
कल्पनानगर येथे माता रमाई जयंती उत्साहात साजरी
कळंब शहरात स्वच्छतेचा आढावा घेण्यासाठी नगराध्यक्ष कापसे पहाटेच उतरल्या रस्त्यावर