धाराशिव (जयनारायण दरक) –महाराष्ट्र केसरी आणि उप केसरीची शहरातून भव्य मिरवणूक,महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद व आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 65 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा रविवारी दुपारी धाराशिव शहरातील स्वस्तिक मंगल कार्यालयात पार पडला. या सोहळ्यात 1 स्कॉर्पिओ, 1 ट्रॅक्टर, 20 बुलेट आणि 20 शाईन दुचाकीचे मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले.ही महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 16 ते 20 नोव्हेंबर दरम्यान मुख्य आयोजक सुधीर पाटील यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आली होती. सोहळ्यापूर्वी महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा विजेता शिवराज राक्षे व उपविजेता हर्षवर्धन सदगीर यांची धाराशिव नगरातून जंगी मिरवणूक काढण्यात आली. या जंगी मिरवणूकीचे चौका -चौकात भव्य स्वागत करण्यात आले.आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुधीर पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. त्यांनी या कुस्ती स्पर्धेचे यशस्वीपणे आयोजन कसे केले याबद्दल माहिती देतानाच कुस्ती खेळाच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासनाकडून सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. मान्यवरांनी आपल्या मनोगतात आयोजक सुधीर पाटील, युवानेते अभिराम पाटील यांचे या यशस्वी स्पर्धेसाठी आभार मानून विशेष कौतुक केले. या सोहळ्याला धाराशिव मतदार संघाचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, अर्जून वीर पुरस्कार विजेते काकासाहेब पवार, महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे सचिव वामनराव गीते, राष्ट्रवादी कॉग्रेसचे (अजित पवार गट) जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे तर शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर, भाजपा राज्य कार्यकरिणी सदस्य बसवराज मंगरूळे, विनोद गपाट, सतीश देशमुख, राज्य बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. मिलिंद पाटील, हनमंत मडके, काकासाहेब सांळुखे, नवनाथ जगताप, युवराज राक्षे, किरण मोरे, नगर सेवक सोमनाथ गुरव, खो खो असोसिएशनचे डॉ. चंद्रजित जाधव,सिद्धीविनायक ग्रुपचे संस्थापक दत्ताभाऊ कुलकर्णी संस्थेचे सरचिटणीस प्रेमाताई पाटील, प्रशासकीय अधिकारी आदित्य पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.या स्पर्धेत राज्यभरातील 950 कुस्तीगीरांनी भाग नोंदवला होता तर 500 पंचांनी या स्पर्धेचे काम पाहिले होते. माती आणि गादी या दोन गटात प्रत्येकी 10 अशा 20 प्रमुख लढतीतून महाराष्ट्राचा 65 वा महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे ठरला. त्याने हर्षवर्धन सदगीरला पराभूत केले. या 65 व्या महाराष्ट्र केसरीचा विजेता नांदेडचा शिवराज राक्षे यांना महिंद्रा स्कॉर्पियो तर उपविजेता नाशिकचा हर्षवर्धन सदगीर यांना महिंद्रा ट्रॅक्टरचे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले.या स्पर्धेतील 20 गटातील विजेत्यांना पारितोषिक म्हणून बुलेट व शाईन गाड्यांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.यशस्वी आयोजनया स्पर्धेचे नियोजन युवा नेते अभिराम पाटील यांनी केले होते तर काकासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या स्पर्धेला राज्यभरातील क्रीडाप्रेमींनी भरभरून प्रतिसाद दिला होता. या स्पर्धेचे अतिशय शिस्तबद्ध आणि सुयोग्य नियोजन करण्यात आले होते. स्पर्धेच्या या बक्षीस वितरण सोहळ्याला जिल्हयातील विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी, संस्थेतील सर्व शाखेचे प्राचार्य, पर्यवेक्षक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.पाटील परिवारावर सर्व स्तरातून कौतुकाची थाप अशी माहिती शितल गायकवाड यांनी सा. साक्षी पावन ज्योतशी दिली.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते चॅटबोटचे उद्घाटन
आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी जिल्हास्तरीय निवड चाचणी ११ ऑगस्टला