कळंब – महाराष्ट्र पोलीस मित्र सोशल असोसिएशन या सामाजिक संघटनेच्या वतीने प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विविध क्षेत्रात सामाजाची सेवा करणाऱ्यांना महाराष्ट्र राज्याचा अत्यंत मानाचा समजला जाणारा पुरस्कार, नेताजी सुभाषचंद्र बोस जीवनगौरव पुरस्काराने 20 पुरस्कारार्थींना सन्मानित करण्यात आले.यात मोहा गावचे सुपुत्र सुभेदार विश्वनाथ साहेबराव जाधव,माजी सैनिक यांनाही शाल श्रीफळ,प्रमाणपत्र,ट्राॅफी,पुष्पहार घालून सन्मानित करण्यात आले, पत्रकार भवन लातूर याठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष साहेबअली सौदागर, प्रमुख अतिथी जि.प.लातूरचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय गिरी साहेब, मराठवाडा अध्यक्ष चंद्रकांत वायाळ, उषाताई धावारे,खाॅजा पटेल, ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष महादेव महाराज आडसुळ,सा.साक्षी पावनज्योतचे संपादक सुभाष घोडके,सुफी सय्यद शमशोद्दीन, जिल्हा अध्यक्ष गंगासागर ढवळे,शेखर कांबळे,सुरेखा घोडके,काष्ट्राईब चे दिलीप शितोळे,सुरज मांदळे,सर्व पदाधिकारी, सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.त्यांच्या निवडी बद्दल सर्वत्र विश्वनाथ जाधव यांचे स्वागत केले जात आहे.
More Stories
त्याग,समर्पण आणि प्रेरणेचा जागर;माता रमाई जयंती उत्साहात साजरी
आई-वडिलांमुळेच आपल्या अस्तित्वाची ओळख –डॉ.सुनील गायकवाड
खरोसा लेणी येथे माघ पौर्णिमा उत्सव उत्साहात साजरा;६५ धम्म अनुयायांचा सहभाग