बदलापूर – सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्रालय महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दिला जाणारा डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार समाजमित्र तात्यासाहेब सोनवणे बदलापूर जि. ठाणे यांना जाहीर झाला असून मंगळवार दि.१२ मार्च २०२४ रोजी त्यांना समारंभपूर्व सोहळ्यात प्रदान करण्यात येणार आहे.
गेली २९ वर्ष अविरतपणे साहित्य, लेखन करीत, असह्य रुग्ण, असह्य विद्यार्थांला वैद्यकीय व शैक्षणिक मदत करीत आहेत. जागल्या काव्यसंग्रह, वैद्यकीय मदत व माहितीचा आधार, पुस्तके प्रकाशित असून, शाळा उपेक्षेची कविता संग्रह व लढाई कोरोनाशी विशेषांक प्रकाशनाच्या मार्गावर आहेत. मानवमुक्तीचे प्रणेते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांच्या पाऊलखुणांवरून त्यांचा प्रवास सुरू असून, रूग्णहक्क संघर्ष समिती, व जीवन आधार फौंडेशन रेस्क्यू फोर्स व सामाजिक संस्थेचे ठाणे जिल्हा सोशल मीडिया प्रमुख म्हणून काम करीत आहेत. सामाजिक काम करताना जाती आणि ज्ञातीचा विचार न करता आदिवासी, वंचित बहुजन समाजातील असह्य वेदनादायी प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यासाठी शासन प्रशासकीय अधिका-याकडून सोडवत आसतात.सध्या ते बहुजनांच्या न्याय हक्कांसाठी कळंब जि.धाराशिव येथून प्रकाशित होणारे सा.साक्षी पावनज्योतचे मुंबई विभागाचे उपसंपादक म्हणून काम पाहत आहेत.
त्यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण”, पुरस्कार मिळाल्याबद्दल आमदार किसन कथोरे मुरबाड विधानसभा,केंद्रीय मंत्री ना.रामदास आठवले,केंद्रीयमंत्री ना.कपिल पाटील,पद्मश्री डॉ.तात्याराव लहाने, आ. डॉ.बालाजी किणीकर,आ.ज्ञानेश्वर म्हात्रे, जालिंदर सावंत,शरद तेली माजी उपनगराध्यक्ष कु. ब. न. प. मा. संभाजी शिंदे,बाळाशेठ घोरपडे, प्रा. बुटेरे,किरण भोईर, सुनिल मेने, सौ. निशाताई घोरपडे, सौ. मेघाताई गुरव,ॲड.केवल उके,प्रकाश दादा पाटील, रोहनशेठ पाटील,गोपाळ लांडगे साहेब,डॉ. नागेश बोरगावकर, डॉ. कैलास पवार, डॉ. राजेश अंकुश, सा.साक्षी पावनज्योत संपादक,सुभाष घोडके,लातूर प्रतिनिधी दिलीप आदमाने,उत्तम विशे, मिलिंद धारवाडकर,दिलीप आदमाने, सौ. वाघमारे, तुषार प्रभुदेसाई, उदयदादा किरपण आदींनी अभिनंदन केले आहे.
More Stories
पनवेल आगारात ARTFX स्कूल ऑफ ॲनिमेशनचा स्तुत्य उपक्रम
राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांच्या मतमोजणी दिनांकात बदल
ईव्हीएम-व्हीव्हीपॅट मशिन्सच्या Burnt Memory तपासणी प्रक्रिया पूर्ण