August 8, 2025

“साक्षी” कादंबरी देवून पोलिओ लसीकरण मोहिमेत सहभागींचा सत्कार

  • ढोकी (महेश फाटक ) – राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेत ढोकी येथे दि.३ मार्च २०२४ रोजी वसंतराव काळे महाविद्यालयातील कार्यरत कुमार चव्हाण व धावारे यांना प्रबुद्ध रंगभूमी बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष सुभाष घोडके सत्यघटनेवर आधारित “साक्षी” ही कादंबरी व कळंब येथून प्रकाशित होणारा सा.साक्षी पावनज्योतचा अंक व्हॉईस ऑफ मीडिया कळंब तालुकाध्यक्ष रणजित गवळी यांच्या हस्ते देण्यात आला.
    याप्रसंगी व्हॉईस ऑफ मीडिया साप्ताहिक विंग कळंबचे तालुकाध्यक्ष प्रा.अविनाश घोडके,तालुका उपाध्यक्ष राजाभाऊ बारगुले,तालुका उपाध्यक्ष महेश फाटक,तालुका सचिव जयनारायण दरक,तालुका संघटक अशोक कुलकर्णी ,पत्रकार शौकत शेख,सिंकदर पठाण आदी पदाधिकारी व सदस्यांची उपस्थिती होती.
error: Content is protected !!