February 8, 2026

राष्ट्रीय सेवा योजना शिबिर म्हणजे सर्वांगसुंदर आयुष्य जगण्याचे बळ – डॉ.बालाजी कांबळे

  • लातूर ( दिलीप आदमाने ) – देशाचे सुजाण नागरिक घडवण्याचे कार्य राष्ट्रीय सेवा योजनेतून होते त्यातूनच सर्वांगसुंदर आयुष्य जगण्याचे बळ मिळते असे प्रतिपादन डॉ. बालाजी कांबळे यांनी केले.
    स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड सलग्नित राष्ट्रीय सेवा योजना,महात्मा बसवेश्वर महाविद्यालय, लातूर आणि ग्रामपंचायत कार्यालय, जवळा बु. यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजनेचे वार्षिक विशेष युवक शिबिर मौजे जवळा ( बु.) येथे आयोजित करण्यात आले आहे यावेळी बौद्धिक प्रबोधनर व्याख्यानात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
    या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कार्यक्रमाधिकारी डॉ.शिवप्रसाद डोंगरे हे होते तर विचारपिठावर डॉ. मनोहर चपळे, प्रा.किसनाथ कुडके आणि उपसरपंच मनोज कापरे आदीची उपस्थिती होती.
    कार्यक्रमाच्या प्रारंभी राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
    पुढे बोलताना डॉ.कांबळे म्हणाले की,राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष शिबीर म्हणजे आयुष्याची संस्कार शाळा असते.विद्यार्थ्यांना श्रमसंस्कार,सभाधिटपणा, समायोजनशिलता,सांघिक भावना,सामाजिक बांधिलकी, राष्ट्रप्रेम, ग्रामीण प्रश्नांची जाणीव आणि सामाजिक आव्हाने पेलण्याचे सामर्थ्य राष्ट्रीय सेवा योजनेतून प्राप्त होते. विद्यार्थ्यांच्या प्रत्येक जीवनाची राष्ट्रीय सेवा योजना एक कार्यशाळा आहे यात विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो.
    अध्यक्क्षीय समारोप करताना डॉ. शिवप्रसाद डोंगरे म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता राष्ट्रीय सेवा योजना हा उत्तम पर्याय आहे. देशभरातील ४० लाखापेक्षा अधिक विद्यार्थी राष्ट्रीय सेवा योजनेच्या मार्फत सामाजिक बांधिलकी जोपासत देशाकरिता उत्कृष्ट असे कार्य करीत आहेत. देशाच्या उज्वल भवितव्यासाठी ध्येयवादी, कर्तव्यनिष्ठ आणि कार्यतत्पर पिढी घडवण्याची नितांत आवश्यकता आहे असेही ते म्हणाले.
    या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. मनोहर चपळे यांनी केले. सूत्रसंचालन धनश्री भांडे यांनी केले तर आभार ऋतुजा भिसे यांनी मानले.
    कार्यक्रमाला ग्रामस्थ आणि शिबिरार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
error: Content is protected !!