August 8, 2025

कळंबमध्ये होणार शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण व संत रोहिदास महाराज सभागृह

  • कळंब – कळंब येथे नगर विकास विभाग अंतर्गत नगरपरिषद वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान योजनेतून तालुकाध्यक्ष अजित पिंगळे यांच्या प्रयत्नातून मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व आ. राणाजगजीतसिंहजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराज चौक सुशोभीकरणासाठी 40 लाख रुपये व श्री संत रोहिदास महाराज मंदिराजवळ सभागृहासाठी 10 लक्ष रुपये मंजूर झालेले आहेत.
    गेल्या दोन वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण व्हावं यासाठी भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष अजित पिंगळे हे प्रयत्न करत होते. तसेच गेल्या वर्षी श्री संत गुरु रविदास महाराज जयंती उत्सव – 2023 यामध्ये आ.राणाजगजीतसिंहजी पाटील यांनी सभागृहासाठी निधी घोषित केला होता. यासाठी अजित पिंगळे यांनी पाठपुरावा करुन हे दोन्ही कामे मंजूर करुन घेतली.
    छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे सुशोभीकरण होणार असल्यामुळे शिवप्रेमीमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. त्याचप्रमाणे संत रोहिदास महाराजांचे सभागृह होणार असल्यामुळे कळंब तालुक्यातील चर्मकार समाजही आनंदी झाल्याचे दिसून आले.
error: Content is protected !!