आमचे साहित्यिक गुरुवर्य इंद्रजित भालेराव यांना स्मरून, “स्वराज्य जननी राष्ट्रमाता जिजाऊ” तथा “आऊसाहेब” यांना नतमस्तक होताना सन्मानित सौ. उर्मिला संभाजी शिंदे, महिला शहराध्यक्षा शुभेच्छा देताना साहित्यीक, पत्रकार म्हणून अभिनंदन करण्यापूर्वी, दोन ओळी समस्त महिला भगिनींना आपल्या कर्तव्याची जाणीव व्हावी म्हणून अधोरेखित कराव्याशा वाटतात, “तूला आळविता स्फूर्तात बाहू.. राष्ट्रमाता आई जिजाऊ.!” काल केंद्रीय मंत्री ना. रावसाहेब दानवे, ना. कपिल पाटील, लोकनेते आ. किसन कथोरे ( आप्पा) यांच्या उपस्थितीत सौ. उर्मिला संभाजी शिंदे, “ताईसाहेब”,यांची भारतीय जनता पार्टी, कुळगाव बदलापूर भाजपा शहरमंडलाच्या पूर्वेच्या अध्यक्षपदी निवड झाली. अभ्यासू व्यक्तीमत्त्व मा. संभाजी शिंदे साहेब यांनी मागच्या काळात, मतदार याद्या,प्रदेश पातळीवरचे खिशाला चाट लावून घेतलेले विविध उपक्रम लक्षवेधक आहेत.उत्तम पक्ष संघटक म्हणून आपण स्विकारलेली जबाबदारी वाखाणण्याजोगी आहे. म्हणूनच उच्चशिक्षित डी. फार्मसी,पदवीप्राप्त सन्मानित सौ. उर्मिला संभाजी शिंदे,तथा ताईसाहेब यांना महिलाध्यक्षपदाची दिलेली जवाबदारी पक्ष पदाधिकारी, महिला पदाधिकारी यांच्या सहकार्याने यशस्वी पार पाडतील हा आत्मविश्वास जपतो. आणि भावी वाटचालीस शुभेच्छा.!
@ समाजमित्र तात्यासाहेब सोनवणे, सोशल मीडिया ठाणे जिल्हा ग्रामीण+ ९३२४३६६७०९
More Stories
उल्हास नदी बचाव समितीच्या आंदोलनाला यश;अनधिकृत भराव प्रकरणात दहा कोटीचा दंड
प्रेरणा फाउंडेशनचा मोफत आरोग्य शिबीर व सामाजिक पुरस्कार वितरण सोहळा धुमधडाक्यात साजरा
जिंदादिली का दुसरा नाम, जालिंदर सावंत साहेब!