धाराशिव-भारतीय संविधान अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त मतदार जनजागरण समितीच्या वतीने भारतीय संविधान जनजागरण अभियान राबविण्यात येत आहे, प्रत्येक महिन्याच्या २६ तारखेला विविध मान्यवरांच्या उपस्थितीत विविध ठिकाणी संविधानावरती व्याख्यान घेतले जाते.दि.२६ फेब्रुवारी २०२४ रोजी सह्याद्री नर्सिंग कॉलेज धाराशिव येथे भारतीय संविधानावरती व्याख्यात्या सामाजिक चळवळीतील ज्येष्ठ नेत्या डॉ.स्मिताताई शहापुरकर यांचे व्याख्यान झाले. भारतीय संविधान आपणाला जगायला शिकविते,संविधान आपण समजुन घेतले पाहिजे,बुध्दीजीवी समजल्या जाणाऱ्या विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आतोनात कष्ट सोसुन आज आपणाला संविधान दिले,हे संविधान दुसऱ्या कोणाला दिले नाही तर आपल्याला दिले आहे, भारतीय संविधान उद्देशिका ही संविधानाचा गाभा आहे संपुर्ण संविधानातील आशय आहे, संविधान वाचा समजून घ्या,अगदी घरातील घटनांना उजाळा देत ज्या प्रकारे आपण नियमांचे पालन करतो बरे वाईटास समजतो.त्याच घटना प्रमाणे आपण वागतो अशा सोप्या भाषेत संविधान सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केला, कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषणात कुलस्वामिनी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष डॉ.रमेश दापके देशमुख यांनी म्हणाले की, संविधानामुळे आपण आहोत,आम्ही काॅलेज मध्ये सामाजिक उपक्रम राबवितो आणि आजच्या संविधान अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त मतदार जनजागरण समितीच्या वतीने आयोजित व्याख्यानात आम्हाला संधी मिळाली त्याबद्दल त्यांनी आयोजकांचे आभार व्यक्त केले,कार्यक्रमाचे सुरुवातीला भारतीय संविधान उद्देशिकाचे सामुदायिक वाचन विजय गायकवाड यांनी केले तर उद्देशिकातील अनुवाद व्याख्या गणेश रानबा वाघमारे यांनी वाचन केले, प्रस्तावना प्राचार्य सोमनाथ लांडगे यांनी केली तर सुत्रसंचलन अब्दुल लतिफ अब्दुल मजीद यांनी व आभार चेतन सिरसाठे या विद्यार्थ्यांने मानले.मतदार जनजागरण समितीच्या वतीने भारतीय संविधान उद्देशिका व व्याख्या विश्लेषणाच्या प्रति वाटप करण्यात आल्या.कार्यक्रमास व्याख्यात्या सामाजिक चळवळीतील नेत्या डॉ स्मिताताई शहापुरकर,कार्यक्रमाचे अध्यक्ष कुलस्वामिनी शिक्षण मंडळाचे संस्थापक अध्यक्ष डॉ.रमेश दापके देशमुख, पाहुणे म्हणून सामाजिक चळवळीतील ज्येष्ठ विचारवंत अभिमान हंगरगेकर,शिक्षण क्षेत्रातील अभ्यासक तथा विचारवंत सोमनाथ लांडगे,सह्याद्री नर्सिंग कॉलेजचे प्रशिक्षक मुबीन शेख,जगताप सर,मोनिका जाधव,मतदार जनजागरण समितीचे सचिव अब्दुल लतिफ अब्दुल मजीद, उपाध्यक्ष गणेश रानबा वाघमारे,संघटक संजय गजधने,सहसचिव बाबासाहेब गुळीग,सदस्य विजय गायकवाड,आकाश उबाळे तर कालेजचे प्राध्यापक, कर्मचारी वर्ग विद्यार्थी अन्य इतर उपस्थित होते.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते चॅटबोटचे उद्घाटन
आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी जिल्हास्तरीय निवड चाचणी ११ ऑगस्टला