August 8, 2025

भास्करराव पेरे पाटील यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम संपन्न

  • ईटकुर – तालुक्यातील ईटकुर येथे सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती व सचिन अश्रुबा गंभीरे यांच्या वाढदिवसानिमित्त आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम संपन्न झाला. मार्गदर्शन पर भाषणामध्ये पेरे पाटील म्हणाले की,मतभेद सोडून दिले तर गावचा विकास करणे शक्य आहे.ईटकुर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त व सचिन गंभीरे यांच्या संकल्पनेतून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी आदर्श सरपंच पेरे पाटील यांनी अनेक विकास कामे कशी करता येतील अशी उदाहरणे त्यांनी केलेल्या कामातून ईटकुर वाशीयांना देत खेळीमेळीच्या वातावरणात संबोधित केले,त्यांनी केलेली अनेक विकासाची कामे कशी मार्गी लावली याचेही मार्गदर्शन केले. मुलांना शिकवा वयोवृद्धांचा संभाळ करा. गावातील कर गावच्या विकासात लावा सर्वांनी ग्रामपंचायतचा कर भरला तरच गावचा विकास करणे शक्य आहे हे ही आपल्या भाषणात नमुद केले.यावेळी शिक्षण व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा संयोजकाच्या वतीने सन्मान करण्यात आला.
    कार्यक्रमाला गावच्या सरपंच मोराबाई कस्पटे,ज्येष्ठ नागरिक व्यंकट गंभीरे, प्रताप पाटील, ग्रामविकास अधिकारी सोनवणे, सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचे सर्व पदाधिकारी व गावातील असंख्य नागरिक उपस्थित होते.
error: Content is protected !!