संभाजीनगर – २० दिवसापासून बेमुदत ठिय्या देवून बसलेल्या माथाडी कामगारांच्या प्रश्नात लक्ष घालून ते मार्गी लावावेत म्हणून शहरातील मंत्र्याचे कार्यालयावर केलेल्या निदर्शनाचे नेतृत्व, मराठवाडा लेबर युनियन चे सरचिटणीस ऍड.सुभाष सावंगीकर यांनी केल्याची माहिती संघटनेच्या वतीने प्रसिद्धीस दिली आहे. सुधारणेच्या नावाने माथाडी कायद्याचा आत्मा काढून घेण्याचा प्रयत्न, बाजार समित्यांचे केंद्रीकरण करण्याचा घाट, वाराई प्रथा संपविण्याचा प्रयत्न इ. प्रश्नावर, विधनसभा अधिवेशनाचे पहिल्या दिवसापासून म्हणजे सोमवार दि.२६ फेब्रुवारी पासून मुंबई येथील आझाद मैदानावर बेमुदत उपोषण सूरु करून आंदोलनाचा एल्गार पुकरण्यात आल्याचे या वेळी सांगण्यात आले.
जिल्ह्यातील कायदेशीर प्रश्नासाठी गेले २० दिवसापासून सूरु आसलेले बेमुदत ठिय्या आंदोलन. कायद्यांचे चौकटीतील सर्व प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडवावेत, माथाडी कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करावी, बेकायदेशीररित्या कामावरून कमी केलेल्या माथाडी ना पूर्ववत कामावर घ्यावे, शासकीय धान्य गोदामातील माथाडी कामगारांचे वेतनातील फरक व महागाई निर्देशांकाची थकबाकी तात्काळ वसूल करावी, इ मागण्या बरोबरच, शेतमालाचे हमीभावास कायद्याचे संरक्षण द्यावे म्हणून, दिल्ली सीमेवर शेतकरी करीत असलेल्या शांततामय आंदोलनास पाठिंबा देत त्यांच्या मागण्या या १४० कोटीच्या मागण्या असून त्याचीही त्वरीत पूर्तता करावी अशी ही मागणी यावेळी करण्यात आली. केंद्रीय राज्य अर्थ मंत्री भागवत कराड, पालक मंत्री संदीपान भुमरे, गृह निर्माण मंत्री अतुल सावे आणि खा. इम्तियाज जलील यांच्या कार्यालयावर निदर्शने करण्यात आली. मंत्री व खासदारांचे स्विय सहाय्यकाकडे मागण्यांची निवेदन सुपूर्द कऱण्यात आली. पुढील आठवड्यात राहीलेल्या लोकप्रतिनिधींच्या कार्यालयावर निदर्शने केली जाणार असून, सर्वांना प्रत्यक्ष भेटून प्रश्नांचे गांभीर्य लक्षात आणून देणार असल्याचे ही पत्रकात नमूद केले आहे.
सर्व लोकप्रतिनिधींनी या ज्वलंत प्रश्नावर पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांना पत्र लिहावीत असा ही आग्रह धरला जाणार असल्याचे पत्रकात नमूद केले आहे.
निदर्शनात मराठवाडा लेबर युनियन – महारष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे उपाध्यक्ष साथी छगन गवळी, बाजार समिती संचालक साथी देविदास किर्तीशाही, साथी प्रवीण सरकटे, साथी जगन भोजने, साथी सर्जेराव जाधव, साथी राजू सुसुंद्रे इ. प्रमुख कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
More Stories
ऊसतोडणी कामगार महिलांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आरोग्य मित्र उपक्रम- रुपाली चाकणकर
सस्ती अदालत उपक्रमातून 560 शेतरस्ते व पाणंद रस्ते मोकळे
हमाल कष्टकऱ्यांच्या बाईक रॅली ने केले शहरात जनजागरण