March 26, 2026

खाजगी डॉक्टरांनी निव्वळ व्यवसाय न करता सामाजिक उत्तरदायित्त्व म्हणून बदलापूरकरांना वैद्यकीय सेवा पुरवावी – वामनदादा म्हात्रे .!

  • बदलापूर ( तात्यासाहेब सोनवणे) – रोटरी क्लब स्मार्ट सिटी व लक्ष्यदीप फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने बदलापूर( पूर्व) येथे २० फेब्रुवारी २०२४ रोजी मोतीबिंदू मुक्त बदलापूर संकल्प अभियानाच्या शुभारंभाला अतिथी म्हणून शिवसेना शहरप्रमुख तथा कुळगाव बदलापूर नगरपरिषदेचे मा. नगराध्यक्ष सन्मानित वामन (दादा) म्हात्रे यांनी वरील विधान केले. आज बदलापूर शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढती आहे, शहरात शासकीय प्राथमिक व आरोग्य केंद्रात* *असहाय्य रूग्णांवर उपचार होत नाहीत.तेव्हा येथील रूग्णांना मुंबईत केईएम,जे.जे.लोकमान्य टिळक,नायर रूग्णालयात हलवावे लागते.मध्यमवर्गीय, सामान्यानां तेही परवडत नाही.तेव्हा कुणाचेही नाव न घेता मोठे नामांकित डॉक्टर पुढे येत नाहीत ही खंत व्यक्त करताना,दादा,पुढे म्हणाले की, वैद्यकीय सेवेला निव्वळ व्यवसाय म्हणून न बघता सामाजिक उत्तरदायित्त्व माफक दरात वैद्यकीय सेवा पुरवावी. लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही शहरात मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून असहाय्य रुग्णांच्या शस्त्रक्रियेत बारा कोटीच्या जवळपास मदत केली आहे. आरोग्य मंत्रालय व खा. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या माध्यमातून ४० खाटांचे अद्ययावत रुग्णालय बांधण्यात येणार आहे.डाॅक्टर आता आपल्याला आम्ही झोपू देणार नाही.जेव्हा जेव्हा आपले शिबीर लागेल तेव्हा जास्तीत जास्त लेन्स आम्ही नेत्ररूग्णासाठी उपलब्ध करून देवू, एवढेच नाही तर शहर शाखेच्या वतीने ग्राहक कक्ष संरक्षण शहरप्रमुख गणेश राणे यांना सांगून रूग्णांना ने,आण करण्यासाठी मोफत रुग्णवाहिका देण्यात येईल असे अश्वाशित केले.डॉ. प्रदीप कोळी, क्लब अध्यक्ष दिनेशजी म्हसकर,रोटरीयन ॲड. तुषार साटपे, डॉ. विसपुते,डॉ.कुर्ले, डॉ.दुडेजा* *डॉ.सौ.कोळी,मा.रसाळ,दुबेजी, यांचे कौतुक करून,शहरातील काही दानशूर उद्योजक,लक्ष्मीपुत्रांनीही आशा सामाजिक उपक्रमास लावावा असे आवाहन वामनदादा म्हात्रे यांनी* *केले.यावेळी दिनेश म्हसकर यांनी वामनदादा म्हात्रे यांचे आभार व्यक्त करून आम्हाला नेहमीच मदत केली आहे. पर्यावरण, शिक्षण, आरोग्य व वैद्यकीय मदत हे आमचे ध्येय आसून डॉ. प्रदीप कोळी यांनी सोडलेल्या लक्षाला,वामनदादा म्हात्रे यांच्या सहकार्याने गती देवू, रोटरीयन मा. चंचलानी यांनी पन्नास लेन्स देण्याची घोषणा केली. या कार्यक्रमाला मा. कपिल पडेल अध्यक्ष रोटरी क्लब इंडस्ट्रीयल इस्टेट,गणेश राणे*, *शिवसेना ग्राहक संरक्षण शहरप्रमुख*
    *प्रकाश सावंत शिवसेना शहर* *सचिव,शिवसैनिक अनंत जवळेकर,बब्रूवान टोंपे,लालसिंग,आदी बहुसंख्येने उपस्थित होते.सूत्रसंचालन विसपुते सरांनी करताना,पापणीत भिजलेलं कधी सजलेलं ..रुग्ण आणि मोतीबिंदू यांच्यातलं नाते कवितेच्या माध्यमातून सजवलं,आम्ही पद्मश्री डॉ.तात्याराव लहाने सरांनी १.लाख ७० हजार रूग्णांना दिलेली नेत्रदृष्टी, त्यांचा जीवनसंघर्ष आजही संपला नाही. मांडताना,आम्हा वाटतो तुमचा अभिमान तात्याराव भारतभूची शान..वैद्यकीय सेवेला व्यवसाय नाही मानले फक्त समाजसेवेला जीणे वाहिले.. बारा कोटी जनतेच्या आशिर्वादाने मिळावा ” नोबेल” पुरस्कार.! फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ! प्रदीप कोळी यांनी आपले उद्दीष्ट रोटरी क्लब आणि लोकसहभागातून साध्य करणार असून, लक्षदीप फाऊंडेशनचे “जेथे दृष्टी हेच लक्ष” शाळा,ग्रामीण भागात,community Involvement उदिष्ट चित्रफीतून उपस्थितांसमोर मांडले.शहराची साडेपाच लाखाच्या जवळपास वाढलेली लोकसंख्या, संगणक,मोबाईल,वाढते वय, बदलेली जीवनशैली यातून डोळयावर ताण येवून आपल्याला संकटाला सामोरे जावे लागते. मोतीबिंदू हा रोग नसून, त्यावर Legion Alcon machine, Ozil Technology जापानीझ लेन्स,अमेरिकन, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बीनटाक्याच्या शस्त्रक्रिया फेकोच्या सहाय्याने करू शकतो. जवळपास २७ हजार मोतीबिंदू रूग्णांना गरज आहे.गरीब व गरजूंना आम्ही नाममात्र शुल्क आकारून वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणार आहोत असे सांगून जीवनात आनंद, आरोग्य समृद्धी यावी यासाठी प्रार्थना करतो आशी कृतज्ञता व्यक्त केली. शहरात आशा उपक्रमाची अत्यंत गरज आहे याबद्दल डॉ. प्रदीप कोळी, दिनेश म्हसकर व टीमचे कौतुक होत आहे.
error: Content is protected !!