March 26, 2026

सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांनी संत रविदास महाराज यांची जयंती साजरी करावी – विकास कदम

  • कळंब – दिनांक 24 फेब्रुवारी 2024 रोजी तिथीनुसार श्री संत गुरु रविदास महाराज यांची जयंती आहे. शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग क्र. GAD – 49022/14/2023- GAD(DESK-29) दि. 27/12/2023 चे परिशिष्ट सन 2024 मध्ये मंत्रालय, शासकीय/ निमशासकीय कार्यालयात साजरे करावयाच्या जयंती / राष्ट्रीय दिन कार्यक्रमाची यादी या प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकानुसार 24 फेब्रुवारी 2024 रोजी संत रविदास महाराज यांची जयंती सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयात साजरी करणे बंधनकारक आहे; असे असताना देखील बहुतांश शासकीय वा निमशासकीय कार्यालयांमध्ये श्री संत रविदास महाराज यांची जयंती साजरी केली जात नाही, असे आमच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे या प्रसिध्दी पत्रकाद्वारे विकास कदम मराठवाडा युवक अध्यक्ष राष्ट्रीय चर्मकार महासंघ यांनी संत रविदास महाराज यांची जयंती शासकीय व निमशासकीय कार्यालये येथे साजरी करण्याची मागणी केलेली आहे व दिनांक 24 फेब्रुवारी रोजी जिल्ह्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालये येथे जाऊन अथवा माहिती घेऊन कार्यालयात जयंती साजरी केली गेली आहे का? याबाबतचा अहवाल जिल्हाधिकारी धाराशिव यांना विनंती करुन मागवून घेऊन ज्या कार्यालयामध्ये जयंती साजरी झाली नाही, त्या कार्यालय प्रमुख यांच्यावर योग्य ती कार्यवाही जिल्हाधिकारी यांनी करावी, अशी मागणी राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने करण्यात येत आहे.
error: Content is protected !!