August 8, 2025

समाज विकास संस्थेचा प्रमाणपत्र वितरण सोहळा संपन्न

  • उमरगा (साक्षी पावनज्योत वृत्त ) – येथील समाज विकास संस्था संचलित जनरल ड्युटी असिस्टंट कोर्स उमरगा जिल्हा.धाराशिव उमरगा ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९४ व्या जयंती निमित्ताने *छत्रपती शिवराय यांचे कार्य* या विषयावरती वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
    सोबत शिवरायांची गाणी या विषयावरती नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये प्रथम,द्वितीय,तृतीय आणी उत्तेजनार्थ विद्यार्थ्यांना प्रमाण पत्राचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी समाज विकास संस्थेचे कार्यवाह भूमिपुत्र वाघ यांनी मार्गदर्शन करताना स्पर्धेच्या जगात जगायचं असेल तर आपल्याला प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक मिळवावाच लागेल. च्या शिवाय यशस्वी होता येणार नाही. खूप मोठी ताकद लावावी लागेल. तरच आपण यशस्वी होऊ शकतो असे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रशिक्षिका रोहिणी गायकवाड यांनी मानले.
error: Content is protected !!