March 26, 2026

घरावर उभारला शिवाजी महाराजांचा आश्वरुढ पुतळा

धारशिव (जयनारायण दरक) – छत्रपती शिवाजी महाराज संपुर्ण जगाला प्रेरणा देणारे एक दैवी व्यक्तीमत्व विशेषतः महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेल्या प्रत्येकाचे आराध्यदैवत,त्या दैवताप्रतिची
निष्ठा प्रर्दशित करण्यासाठी प्रत्येकजण आसुसलेला किंवा प्रत्येकाची तराही वेगळयाच आहेत. अशाच वेगळया तरेने महाराजांच्या विचारावरील आपली निष्ठा त्या
महाराजांचा अश्वरुढ पुतळा घराच्या छतावर उभारुण कळंब तालुक्यातील शिराढोण मधील एक ध्येयवेढया शिवभक्तांनी व्यक्त केला आहे.
नितीन लक्ष्मणराव पाटील आशा या ध्येयवेढया शिवभक्ताचे नाव अगदी लहान पणापासुनच छत्रपती शिवाजी महाराज या व्यक्तीबदल आकर्षण उरी बाळगणा-या नितीन पाटील यांनी प्रत्यक्ष जिवनामध्ये
प्रचंड संघर्ष करुन आज गाव परीसरामध्ये स्वतःचे अस्तित्व निर्माण केले आहे. संघर्षशिल प्रयत्नवादाच्या माध्यमातुन स्वताची स्वप्न सत्यात उतरताना वंदनीय महाराजांचे आकर्षण व प्रेम यात किंचितही कमी होवु न देता त्यात वृध्दी करण्याचा प्रयत्न त्यांनी मनापासुन केला याचाच भाग म्हणुन स्वप्नातील घरकुल
साकरल्या नंतर त्याच घरकुलाच्या छतावर महाराजांच्या अश्वरुढ पुतळा उभारुन जणु त्यांनी आपल्या शिवनिष्ठेचा कळसारोहनच केले आहे. धाराशिव जिल्हयामध्ये घराच्या छतावर पुतळयाची उभारणी केलेले एकमेव घर असल्याने जिल्हाभरातुन पुतळा पाहण्यासाठी शिवप्रेमी येत असतात. पुतळा उभारणीसाठी
पंधरा लाख रुपयाचा खर्च आला होता.

* छत्रपती शिवाजी महाराज तमाम मानव जातीचे आराध्य दैवत असुन मानवी जिवन जगताना मासुन म्हणुन त्यांनी घालुन दिलेली मापदंड हे अखिल मानव जातीसाठी प्रेरणास्त्रोत आहेत. तिच प्रेरणा उराशी बाळगुन त्या प्रेरणेचा दैदिप्तमान प्रकाश गाव व परिसरात अखंडपणे प्रकाशित करीत राहावा. हाच घराच्या
छतावर पुतळा उभारण्याच्या उदेश आहे.

– नितीन पाटील शिवप्रेमी शिराढेाण.

error: Content is protected !!