धाराशिव (जिमाका) – महाराष्ट्राची कुलस्वामीनी श्री. तुळजाभवानी देविच्या दर्शनासाठी संपूर्ण महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश, कर्नाटक, तेलंगना व इतर राज्यातून मोठ्या संख्येने भाविक येतात. कुलदेवता असल्याने या ठिकाणी कुलाचार व कुलधर्म करण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने येतात. देविजीची सिंहासन पुजा ही अत्यंत महत्वाची मानली जाते. ही सिंहासन पुजा नोंदणी ऑनलाईन पध्दतीने तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या अधिकृत संकेतस्थळावर https://shrituljabhavani.org उपलब्ध करून देण्यात येत आहे. मार्च 2024 मधील सिंहासन पुजा ऑनलाईन पद्धतीने स्विकारण्यात येतील. याची सर्व भाविक भक्त, महंत, पुजारी, सेवेकरी व नागरीकांनी नोंद घ्यावी. भाविकांनी सिंहासन पुजा श्री.तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अधिकृत संकेतस्थळ https://shrituljabhavani.org यावरून सिंहासन पुजा पास बुकींग या मेन्युवर क्लिक केल्यानंतर https://shrituljabhavanimataseva.org या लिंकवर प्रवेश करून भाविकांनी आपली सिंहासन पुजेची नोंदणी करावी. सिंहासन पुजा नोंदणी 20 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 10 वाजतापासून ते 24 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत करता येईल. ऑनलाईन ड्रॉ पध्दतीने प्रथम सोडत व भाविकांना पेमेंटसाठी एसएमएस 25 फेब्रुवारी 2024 रोजी 10.30 वाजता पाठविण्यात येतील.भाविकांनी प्रथम सोडतीचे ऑनलाईन पेमेंट 25 फेब्रुवारी सकाळी 10.30 ते 26 फेब्रुवारी सकाळी 10 वाजतापर्यंत करावे. सिंहासन संख्या पूर्ण न झाल्यास ऑनलाईन ड्रॉ पद्धतीने व्दितीय सोडत व भाविकांना पेमेंटसाठी 26 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 10.30 वाजेपर्यंत एसएमएस पाठविण्यात येतील. भाविकांनी व्दितीय सोडतीचे ऑनलाईन पेमेंट 26 फेब्रुवारी रोजी सकाळी 10.30 ते 27 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत करावे. प्रथम व व्दितीय फेरीत सिंहासन संख्या पूर्ण न झाल्यास ऑनलाईन ड्रॉ पध्दतीने तृतीय सोडत व भाविकांना पेमेंटसाठी 27 फेब्रुवारी रोजी सकाळी 10.30 पर्यंत एमएमएस पाठविण्यात येतील.भाविकांनी तृतीय सोडतीचे ऑनलाईन पेमेंट 27 फेब्रुवारी रोजी सकाळी 10.30 ते 28 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत करावे. माहे फेब्रुवारी 2024 या महिन्यातील अंतीम सिंहासन पुजा बुकींग झाल्याची यादी 28 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत प्रसिध्द करण्यात येईल.वरील प्रमाणे भाविकांनी सिंहासन पुजा नोंदणीचा लाभ घ्यावा.असे आवाहन श्री.तुळजाभवानी मंदिर प्रशासन, तुळजापूर यांनी केले आहे.
More Stories
ओबीसी शिक्षकांच्या न्याय्य मागण्यांसाठी आमदार प्रवीण स्वामी सरांची सकारात्मक भूमिका – समाधानाचा नवा किरण
न्यायापासून वंचित असलेल्यांना न्याय मिळावा – न्या.प्रसन्न वराळे
पी एम श्री कन्या प्रशाला तुळजापूरच्या मुलींचा जिल्हा क्रीडांगणावर झंकार — तीन संघ विभागीय पातळीवर दाखल!