August 9, 2025

शिवजयंतीनिमित्त आरोग्य शिबीर,साडी वाटप व मिरवणूक संपन्न

  • कळंब – शिवछत्रपती प्रतिष्ठान कळंब आयोजित छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा स्पेशालिस्ट हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर नेरूळ नवी मुंबई यांच्यामार्फत मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर रविवार दिनांक 18 फेब्रुवारी 2024 रोजी भारतीय जनता पार्टी कार्यालय ढोकी रोड कळंब या ठिकाणी संपन्न झाले. या शिबिरामध्ये 490 रुग्णांची तपासणी व औषध उपचार करण्यात आले. यावेळी 112 रुग्णांना पुढील उपचारासाठी नेरूळ येथे पाठविण्यात आले. शिबिराचे उद्घाटक भाजपा जेष्ठ नेते विजेंद्र चव्हाण, भाजपा तालुकाध्यक्ष अजित पिंगळे यांनी केले. या शिबिरात डॉ. विनोद ओव्हाळ, डॉ .सचिन व्हटकर, डॉ. संदीप खोचरे, डॉ. अजित निळे, नामदेव शेळके यांनी परिश्रम घेतले. यावेळी शिवाजी गिड्डे, माणिक बोंदर , सतिश टेकाळे, संजय घोगरे, मोबीन मनियार, रफिक सय्यद, पिनू जाधवर, शितल चोंदे, राहुल वाघमारे, विकास कदम व युवराज पिंगळे उपस्थीत होते.
    तर दुसऱ्या दिवशी साडी वाटप व मिरवणूक कार्यक्रम आयोजीत केला होता. यावेळी शिवछत्रपती प्रतिष्ठान कळंब व भारतीय जनता पार्टी यांचे कार्य उल्लेखनीय व प्रेरणादायी असून महिलांनी परिस्थितीनुसार आजच्या डिजिटल युगात आपल्या जिवनात बदल करणे काळाची गरज आहे, असे मनोगत भाजपा नेते नितीन काळे यांनी व्यक्त केल्या.
    कळंब येथे राजे शिवछत्रपती यांच्या जयंतीनिमित्ताने भारतीय जनता पार्टी कळंब कार्यालय येथे आयोजित गरीब व होतकरू महिलासाठी ‘साडी वाटप’ कार्यक्रम प्रसंगी भाजपा तालुकाध्यक्ष अजित पिंगळे यांनीही महिलांनी सक्षम व्हावे असे विचार मांडले.
    दरम्यान सुरवातीस मान्यवरांच्या हस्ते श्री शिवछत्रपती यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून धाराशिव लोकसभा प्रमुख नितीनजी काळे, राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य दत्ताभाऊ कुलकर्णी, युवा जिल्हाध्यक्ष राजसिंहराजे निंबाळकर व कार्यक्रमाचे संयोजक व निमंत्रक भाजपा तालुकाध्यक्ष अजित पिंगळे उपस्थित होते.
    भारतीय जनता पार्टीचे आमदार राणाजगजीतसिंहजी पाटील व युवा नेतृत्व मल्हार दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शिवछत्रपती प्रतिष्ठान कळंब आयोजित भाजपा कार्यालयात सुमारे 500 गरीब व होतकरू महिलांना ‘साडी वाटप’ करण्यात आले. सायंकाळी भव्य दिव्य अश्या मिरवणुकीचे आयोजन देखील करण्यात आले.
    हा सर्व कार्यक्रम पार पाडण्यासाठी शिवछत्रपती प्रतिष्ठानचे अध्यक्ष शितल चोंदे, उपाध्यक्ष विकास कदम,राहूल वाघमारे, किरण बोराडे, युवराज पिंगळे, शिवा शिंगणापुरे, इम्रान मुल्ला, अभय गायकवाड, संताजी वीर, रोहीत कोमटवार, बंटी चोंदे, रोहन पांगे, सागर शिंदे, दत्ता हांडिबाग, अशोक क्षीरसागर, स्वरूप पिंगळे, आकाश कवडे, सोनु बोराडे, युवराज धाकतोडे, प्रशांत लोमटे, पिणू जाधवर, उमेश बोंदर, सुरेश वेदपाठक, जोतिबा नवले, यशवंत जाधव, आकाश गायकवाड, विशाल ठोंबरे बापू जाधव, अखिल काझी व प्रतिष्ठानच्या सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
error: Content is protected !!