धाराशिव – रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९४ व्या जयंतीनिमित्त फुले शाहु आंबेडकर उद्यान कृती समितीच्या वतीने अभिवादन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस नगर परिषदेच्या मुख्याधिकारी वसुधा फड यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले.भारतीय संविधान अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त संविधान उद्देशिकाचे सामुदायिक वाचन करण्यात आले.छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे अठरा पगड जातीचा समुह होय.रयतेच्या राजाला अभिवादन करतांना मान्यवरांनी जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या.सर्व प्रथम विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन बुध्द वंदना घेण्यात आली.अभिवादन झाल्यानंतर पेढे वाटप करण्यात आले.नगर परिषदेच्या मुख्याधिकारी वसुधा फड यांना गणेश रानबा वाघमारे यांनी फुले शाहु आंबेडकर उद्यान कृती समितीच्या वतीने भारतीय संविधान उद्देशिका व आम्ही भारताचे लोक याची विश्लेषण प्रत देऊन स्वागत करण्यात आले.यावेळी नगर परिषद मुख्याधिकारी वसुधा फड,पुरातत्वज्ञ व इतिहासकार रविंद्र शिंदे,पृथ्वीराज पवार,संजय कुलकर्णी,विलास गोरे,कुणाल माळाळे,अजिंक्य जानराव तर फुले शाहु आंबेडकर उद्यान कृती समितीचे बाबासाहेब बनसोडे,धनंजय वाघमारे,संपतराव शिंदे,सिद्राम वाघमारे,बलभीम कांबळे,गणेश रानबा वाघमारे,संजय गजधने,संग्राम बनसोडे,बाबासाहेब गुळीग, प्रविण जगताप,सचीन शिंगाडे,महेश,अतुल लष्करे,मनोज बनसोडे अन्य इतर उपस्थित होते,भारतीय संविधान उद्देशिकाचे वाचन धनंजय वाघमारे यांनी केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन संजय गजधने तर आभार बाबासाहेब बनसोडे यांनी मानले.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते चॅटबोटचे उद्घाटन
आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी जिल्हास्तरीय निवड चाचणी ११ ऑगस्टला