धाराशिव- राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री महादेव जानकर, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष काशिनाथ नाना शेवते, पक्षाचे महासचिव माऊली सलगर, मराठवाडा अध्यक्ष विष्णू गोरे, प्रदेश कार्यकारणी सदस्य आश्रुबा कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाचे जिल्हाध्यक्ष बालाजी भारत वगरे यांच्या नेतृत्त्वावर विश्वास ठेवून दि.१५ फेब्रुवारी २०२४ रोजी शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय समाज पार्टीमध्ये जाहीर प्रवेश घेतला. धाराशिव येथे राष्ट्रीय समाज पक्षाची बैठक घेण्यात आली. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी देवळाली गावातील वसंत कस्पटे,महादेव कस्पटे,राम भानवसे, सोमनाथ पानढवळे, जनार्दन घोडके, हणमंत पानढवळे,पांडुरंग घोडके,मल्हारी पानढवळे,लक्ष्मण घोडके,नितीन घोडके,श्रीकांत घोडके,अरुण कस्पटे, अविनाश पानढवळे, दिगंबर घोडके, अदित्य दुधभाते, विजय सुरेश भिंगडे, आण्णासाहेब घोडके तसेच महाळंगी या गावातील रसुल शेख, मारुती शिंदे, अखलाख महेबुब शेख, शहाजी काळे, शंकर इंगले, बिरु सोनटक्के, जोतीराम ढवळे, बालाजी काळे, रमाकांत बचाटे, रामेश्वर सुरवसे, साहेबराव राऊत, हनुमंत काळे यांनी राष्ट्रीय समाज पक्षामध्ये प्रवेश केला. सदरवेळी विधी न्याय विभाग अॅड. शम्सोद्दीन जिलानी सय्यद, धाराशिव तालुकाध्यक्ष सचिन देवकते, शहराध्यक्ष सलीम भाई पठाण, मेजर अशोक गाडेकर, विठ्ठल खटके, विद्याधर क्षिरसागर, आकास सलगर, राजेश मेटकरी, प्रविण खांडेकर, सोमनाथ धायगुडे, विशाल वाघमारे आदी उपस्थित होते.
More Stories
धाराशिव शहरातील कचरा डेपो इतरत्र हलविण्याची शिवसेना (उ.बा.ठा) पक्षाची मागणी
पहिला आयुर्वेदिक हिमोफिलिया संशोधन प्रकल्प ‘रक्तामृत’चा धाराशिवमध्ये दिमाखदार शुभारंभ
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी