August 9, 2025

“मी रमाई बोलतेय”चा एकपात्री नाट्यप्रयोग उत्साहात संपन्न

  • लातुर (दिलीप आदमाने ) – रमाई जयंतीत “मी रमाई बोलतेय..!”चा 173 वा नाट्यप्रयोग रमाईकार कु.डाॅ.वैभवी घारगावकरने मंगळवारी दि.13/2/24 रोजी रात्री ठिक 8:00 वाजता मौजे भिमनगर बुद्ध विहारासमोर हारेगाव,ता.औसा,जि.लातुर या ठिकाणी उत्साहात सादर करत सर्वांना अश्रुपुर्ण नयनांनी भिमरमाईचे दर्शण देत बुद्ध विहारी जा,धम्म जगा,धम्म वागा,यामुळेच समृद्ध करणारे मांगल्य प्राप्त करत फाटके संसार सोन्याचे करण्याचा आणि भिमरमाईला प्रमाण मानुन सन्मानाने जगण्याचा विचार आपल्या प्रतिभा संपन्न अभिनयातुन मांडला.
    यावेळी अध्यक्षस्थानी मेजर निवृत्ती माने होते. प्रमुख पाहुणे शिवकन्या मुडबे,प.सं.सदस्या औसा,व्यंकट डोंगरे,विद्रोही कवि दिलीप गायकवाड,सुरेखा भालेराव,जि.सचीव,भारतीय बौद्ध महासभा,लातुर,होते.यावेळी बुद्धभिमाच्या प्रतिमांची धुप,दिप,पुष्पाने वंदन करत बुद्ध वंदना घेवुन,पाहुण्यांचा फुलहाराने सत्कार केला.यावेळी सुरेखा भालेराव,व्यंकट डोंग्रेंनी आपले विचार मांडले.तर विद्रोही कवि दिलीप गायकवाडांनी रमाईच्या जिवनावरती कविता सादर केल्या.कार्यक्रमाचे संचलन बिभिषण मानेंनी केले. पांडुरंग माने,बाबासाहेब माने,शोभा माने यांनी मेहनत घेवुन कार्यक्रम यशस्वी केला.श्रोत्यांची ऊपस्थिती प्रशंसनीय होती.
error: Content is protected !!