August 9, 2025

मांडवा येथील रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यासाठी ग्रामपंचायतचे दुर्लक्ष

  • मांडवा ( सुदर्शन देशमुख ) –
    धाराशिव जिल्ह्यातील मांडवा गावातील अतिक्रमण काढण्यासाठी टाळाटाळ होत असल्याचा प्रकार समोर आला आहे . या गावा मध्ये अनाधिकृत बांधकाम केले आहे, तसेच बस सँड वरील असलेल अतिक्रमण तसेच ग्रामपंचायती हद्दीतील दुकाने, टपर्‍या , हॉटेल, गाळेधारक , तसेच अन्य भाडेधारक या सर्व गोष्टी मुळे वाहनांना होणारा अडथळा, वाहतुकीमुळे होणारी गर्दी त्यामुळे नागरिकांना होणारा त्रासाची दखल ग्रामपंचायत सरपंच , ग्रामसेवक यांनी तात्काळ या कडे लक्ष देवून नागरीकांचे प्रश्न मार्गी लावावे .
    मांडवा गावातील हे अतिक्रमण हे कायमच राहील की ग्रामसेवक या प्रश्नाला मार्ग काढतील या कडे सर्व ग्रामस्थांचे लक्ष वेधले आहे .
error: Content is protected !!