August 9, 2025

बोधले महाराज संस्थान कडून धार्मिक व पर्यटन स्थळांची यात्रा

  • *तीनशे ज्येष्ठांचा सहभाग
  • कळंब (बालाजी बारगुले ) – श्री.गुरु रामचंद्र बोधले महाराज संस्थान डिकसळ तालुका कळंब जिल्हा धाराशिव आयोजित दहा दिवसाच्या यात्रेत धार्मिक व पर्यटन स्थळे पाहण्या साठी तीनशे भाविक सहभागी झाले होते.
    या कालावधीत डिकसळ ते द्वारका व द्वारका ते डिकसळ खालील प्रमाणे तीर्थक्षेत्राची यात्रा ह.भ.प. गुरुवर्य प्रकाश बोधले महाराज यांच्या अधिपत्याखाली ह.भ.प.परमेश्वर बोधले महाराज यांच्या मार्गदर्शनाने ह.भ. प.अण्णा महाराज बोधले ह.भ. प.भारत महाराज कोकाटे व ह. भ.प.रामेश्वर बोधले महाराज इत्यादींच्या सहभागातून यात्रा संपन्न झाली.या काळात- नाथ पैठण -उनाईमाता – गरुडेश्वर – नर्मदा नदी – सरदार वल्लभ भाई पटेल स्टेच्यू – पोई चा निळकंठ धाम – द्वारका – द्वारकाधिशाचे दर्शन भेट द्वारका – सोन्याची द्वारका -नागेश्वर मंदीर – रुक्मीनी मंदीर – हर्षदा माता -मुळ द्वारका – पोरबंदर – सुदाम पूरी – सोरटी सोमनाथ – भालूका तिर्थ – कृष्ण निजधाम ठिकाण – संगम – गिरणार पर्वत -जूना गड- दत्त दर्शन – निळकंठेश्वर – वनी सप्त श्रंगी माता – पंचवटी नासीक – शिर्डी – शनि शिंगणापूर – नेवासा – ते डिकसळ येथे यात्रा संपन्न झाली या यात्रा काळात ट्रॅव्हल्स मधील सर्व भाविकांना उत्तम पद्धतीची सेवा व वागणूक दिल्याबद्दल गाडी ड्रायव्हर मंगेश निंबाळकर,अविनाश जाधव यांना या भाविकांच्या कडून पूर्ण कपड्याचा आहेर देऊन सन्मान करण्यात आला.
    या धार्मिक यात्रेत एक फोर व्हिलर,सहा ट्रॅव्हल्स,एक अन्न छत्र साठी स्वतंत्र गाडी एकुण तीनशे भावीक सोबत होते.भाविक भक्ता ना अगदी माफक दरात हि यात्रा घडवून आणल्याने, भाविकांकडून समाधान व्यक्त होत आहे.
    बोधले महाराज यांच्या मार्गदर्शानाखाली निघालेल्या या धार्मिक यात्रेत खूप छान सोय करण्यात आली होती. मुक्कामाच्या ठिकाणी भजन, कीर्तन, प्रवचन ठेवण्यात आले होते.या यात्रेत ज्येष्ठ नागरिक यांची संख्या मोठी असल्याने, बोधले संस्थानने खूप काळजी घेतली.यांच्या मुळेच आम्हाला अनेक देवस्थान, व पर्यटन स्थळे पाहण्याची संधी मिळाल्याचे मत सौ.सुनंदा ताई काळे यांनी व्यक्त करून, महाराजांनी आयोद्या दर्शन घडवावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
error: Content is protected !!