August 9, 2025

कायद्याचे अंमलबजावणी साठी माथाडी कामगारांचे बेमुदत ठिय्या आंदोलन सुरु

  • संभाजीनगर (अविनाश घोडके) – माथाडी कायद्याचे चौकटीतील सर्व प्रलंबित प्रश्न तात्काळ मार्गी लावावेत या प्रमुख मागणी साठी, माथाडी कामगारांनी कामगार उपायुक्त कार्यालयावर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केल्याची माहिती, मराठवाडा लेबर युनियन चे सरचिटणीस ऍड.सुभाष सावंगीकर यांनी प्रसिध्दीस दिली आहे.
    बेमुदत साखळी उपोषण व ठिय्या आंदोलनात शासकिय धान्य गोदाम, कारखाने, बाजार समिती इ. मधील माथाडी कामगार आंदोलनात सहभागी झाले होते.
    शेतकरी शेतमजुर पंचायत चे प्रदेशाध्यक्ष साथी बलवंत मोरे, अंद्धश्रद्धा निर्मूलन समिती चे साथी भाऊसाहेब पठाडे, स्वराज अभियान चे साथी खुर्रम यांनी ठिय्या आंदोलनास पाठिंबा दिला.
  • *माथाडी कामगारांनी सर्व असंघटीत कष्टकऱ्यांच्या आंदोलनाचे नेतृत्व करावे – साथी सुभाष लोमटे
  • सरकारची धोरण देशातील तमाम कष्टकरी व शेतकऱ्यांच्या विरोधातील आहेत. म्हणून शेतकऱ्यांसह सर्व असंघटीत कष्टकऱ्यांचा व्यापक एकजूट करण्यासाठी माथाडी कामगारांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन, महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे सरचिटणीस साथी सुभाष लोमटे यानी केले.
    पुढील प्रमाणे मागण्या आहेत – माथाडी कायद्याची सार्वत्रिक – काटेकोर अंमलबजावणी करा,माथाडी कायद्याचे चौकटीतील सर्व प्रलंबीत प्रश्न तात्काळ मार्गी लावावेत, शासकीय धान्य गोदामातील माथाडी कामगारांची सर्व थकबाकी वसूल करावी, शेतकऱ्यांचे शेतीमालाच्या हमी भावास कायद्याचे संरक्षण द्यावे,माथाडी कामगारासह शेतकरी व अन्य असंघटित व ग्रामीण कष्टकऱ्यांना म्हातारपणासाठी किमान ५ हजार रुपये पेन्शन सुरु करा,जिल्ह्यातील माथाडी कामगारांसाठी किमान ४०% लेव्ही ची तरतूद करावी, महागाई चा मुकाबला जिल्हयातील माथाडी कामगारांना करता यावा म्हणून, तात्काळ किमान वर्षाला महागाई भत्ता देण्याची तरतूद करावी.. इ. मागण्यांचा समावेश आहे.
    माथाडी मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत राऊत यांना मागण्यांचे निवेदन देवून लवकरात लवकर प्रश्न मार्गी लावावेत असे आवाहन केले. त्यावेळी भेटलेल्या शिष्टमंडळात साथी सुभाष लोमटे यांचे सह, मराठवाडा लेबर युनियन चे साथी छगन गवळी, साथी प्रविण सरकटे, साथी देविदास किर्तीशाही, साथी जगन भोजने, साथी संतोष म्हैसमाले इ. चा समावेश होता.
error: Content is protected !!