कळंब (जयनारायण दरक) – कळंब तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार मुस्ताफा खोंदे यांनी तालुक्यात विमुक्त भटक्या जमाती,भूसंपादन,मराठा आरक्षण व इतर विविध क्षेत्रातील शिबिर आयोजित करुन तसेच रस्ते अतिक्रमण मुक्त करणे व इतर महसूल सह पुरवठा विषयक तसेच कळंबचे प्रभारी तहसीलदार म्हणून कामकाजामध्ये उत्कृष्ट कामकाज बजावल्या बद्दल तसेच जनतेला व रेशन कार्डधारकांना तत्परतेने सेवा देऊन कळंब तहसील कार्यालयाची प्रतिमा उंचावल्याबद्दल कळंब तालुक्यातील वाठवडा येथील संघर्ष दिव्यांग समाजीक संघटना यांच्या वतीने वाठवडा येथील ग्रामपंचायत कार्यालयात त्यांचा जंगी सत्कार करण्यात आला यावेळी सरपंच सौ.सुरेखा आल्टे,धाराशिव येथील अभिलेख ॲड.प्रबुध्द कांबळे,दिव्यांग समाजीक संघटना जिल्हा उपाध्यक्ष दशरथ कांबळे,प्रमोद पवार,कै.आण्णासाहेब पाटील विद्यालयाचे मुख्याध्यापक बालाजी आल्टे,ग्रामसेवक लाडे,पोलिस पाटील शिध्दार्थ आल्टे,ग्रा.प सदस्य सोमनाथ टिंगरे,आकाश पवार,झुंबर कांबळे, नितीन टेकाळे,जयपाल राऊत,रमेश आल्टे,पांडुरंग आल्टे,समीर बेग,धिरज व्यंजने,खंडेराव आल्टे आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
More Stories
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन