धाराशिव (जिमाका) – धाराशिव जिल्हा महसूल आस्थापनेवरील तलाठी संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी टी.सी.एस. कंपनी मार्फत शासनाकडून 17 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर 2023 या कालावधीत ऑनलाईन पध्दतीने परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेतील प्राप्त गुणांनुसार प्रवर्गनिहाय / समांतर आरक्षणनिहाय तात्पुरती निवड व तात्पुरती प्रतिक्षा यादी शासन स्तरावरुन व या कार्यालयाचे संकेतस्थळावर www.osmanabad.gov.in वर प्रसिध्द करण्यात आली आहे.
अपर जमाबंदी आयुक्त आणि अतिरिक्त संचालक भूमि अभिलेख, पुणे यांनी कळविल्याप्रमाणे टी.सी.एस.कंपनी मार्फत प्रतिक्षा यादीतील उमेदवारांच्या डोळ्यांतील बुब्बळांच्या आधारे तसेच चेहरा ओळखप्रणालीचा वापर करुन बायोमेट्रीकद्वारे व हाताच्या ठस्यांची तपासणी करण्यासाठी 6 फेब्रुवारी 2024 रोजी धाराशिव जिल्ह्यात येणार आहेत.
त्याअनुषंगाने जिल्ह्यातील तलाठी भरती-2022 च्या अंतिम निवड यादीतील व प्रतिक्षा यादीतील सर्व उमेदवारांनी त्यांची डोळ्यांतील बुबुळांच्या आधारे तसेच चेहरा ओळखप्रणालीचा वापर करुन बायोमेट्रीकद्वारे व हाताच्या ठस्यांची तपासणीकामी 6 फेब्रुवारी रोजी सकाळी 10.30 वाजता जिल्हा नियोजन सभागृह,जिल्हाधिकारी कार्यालय परीसर, धाराशिव येथे उपस्थित रहावे.
तसेच अंतिम निवड यादीतील उमेदवारांच्या मुळ कागदपत्रांची पडताळणीसाठी 7 ते 8 फेब्रुवारी रोजी व प्रतिक्षा यादीतील उमेदवारांच्या मुळ कागदपत्रांची पडताळणीसाठी 8 ते 9 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत जिल्हा नियोजन सभागृह, धाराशिव येथे करण्यात येणार आहे. तेंव्हा अंतिम निवड यादी व प्रतिक्षा यादीतील उमेदवारांनी मुळ कागदपत्रांसह व त्यांचे साक्षांकित छायाप्रतींच्या दोन संचासह तसेच जाहिरातीत नमुद पात्रतेच्या संदर्भात अनुषंगिक कागदपत्रांसह जिल्हा नियोजन सभागृह,जिल्हाधिकारी कार्यालय,धाराशिव येथे वेळेवर उपस्थित रहावे.असे जिल्हा निवड समितीचे सदस्य सचिव तथा निवासी उपजिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे यांनी कळविले आहे.
More Stories
निरोगी गावाकडे वाटचाल;मौजे बोरफडी येथे ‘अनिमिया मुक्त गाव’ उपक्रमाचा भव्य शुभारंभ
ग्रामोदय समितीच्या संचालकपदी उद्योजक गुंडू पवार यांची एकमताने निवड
शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना ज्ञान प्रसार विद्यालयात अभिवादन