August 8, 2025

हळदी कुंकू,तिळगुळ वाटप कार्यक्रम संपन्न

  • गौर – लोकशाहीर आण्णाभाऊ साठे सामाजिक संस्था गौर तालुका कळंबच्या वतीने दि.३० जाने २०२४ रोजी वार मंगळवारी हळदी कुंकू तिळगुळ वाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
    याप्रसंगी मोहा येथील शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर उद्योग समूहाचे अध्यक्ष हनुमंत (तात्या) मडके यांनी उपस्थित महिलांना व्यवसाय सुरू करण्यासाठी मार्गदर्शन केले.
    याप्रसंगी विश्वनाथ चव्हाण जिल्हा उद्योग केंद्र धाराशिव,
    महिला हेड कॉन्स्टेबल येरमाळा पोतदार,गौर ग्रामपंचायत सरपंच सौ.सुषमा देशमुख, माजी पंचायत समिती सदस्य हनुमंत माने,संस्थेचे सचिव सौ. ज्योतीताई तौर,बेबी नंदातौर यांनी सर्व महिलांची प्रमुख उपस्थिती होती.
    या संस्थेचे अध्यक्ष हनुमंत तौर यांच्या संकल्पनेतून महिलांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी स्वतःच्या व्यवसाय चालू करण्यासाठी मेळावा घेण्यात आला.
    शेवटी प्रतीक्षा तौर यांनी सर्वांचे आभार व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
error: Content is protected !!