कळंब (जयनारायण दरक) – शिक्षकांनी मांडली शाळेची यशोगाथा ऐकून आली मदतीला गावकरी…. अवघ्या दोन मिनिटात वरपे व बागरेचा यांच्याकडून झाले दोन लाख रुपये शाळेला देण्याचे जाहीर. कळंब तालुक्यातील मंगरूळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमांमध्ये गावातील प्रतिष्ठित नागरिक, तसेच नवयुक्त शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य उपस्थित होते त्यांचा निरोप व सत्काराचा कार्यक्रम ठेवला होता. या कार्यक्रमात कांबळे यांनी शाळेची यशोगाथा सर्व गावकऱ्यांच्या समोर व्यक्त केली. शाळेचा विकास शाळेत असलेले उपक्रम,स्पर्धा परीक्षा,क्रीडा स्पर्धा यामध्ये शाळेचे प्रगती सर्व टॉप घेत असलेल्या मेहनतीच्या जिल्हा, विभाग स्तरावर मंगरूळ गावचे नाव लौकिक करणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मंगरूळ शाळेतील सर्व स्टाफचा उत्साह पाहून उत्स्फूर्तपणे शाळेला लोक वाटा मोठ्या प्रमाणात जाहीर करण्यात आला. यामध्ये शाळेला डिजिटल लायब्ररी तयार करण्यासाठी सचिन सुभाष वरपे (इंजिनीयर मंगरूळ) एक लाख रुपये, डॉ.महावीर सतीश बागरेचा यांनी एक लाख रुपये, अनिल नानासाहेब रितापुरे (शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष) अकरा हजार रुपये, अँड.घनश्याम रितापुरे यांनी एक हजार पुस्तके तर सरपंच सौ.केवळबाई नारायण शिंदे व ग्रामविकास अधिकारी सोनवणे यांच्यावतीने यासाठी लागणारे सर्व फर्निचर देण्याचे जाहीर केले.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले