August 8, 2025

धनेश्वरी कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांनी नॅक मूल्यांकनाची तयारी करावी-डॉ.वेदप्रकाश पाटील

  • संभाजीनगर – श्री धनेश्वरी शैक्षणिक संकुलातील श्री भैरवनाथ निसर्ग मंडळ संचलित धनेश्वरी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाची स्थापना २०१८ साली झाली असून हे महाविद्यालयाने चालू शैक्षणिक वर्षात नॅक मूल्याकनास पात्र झालेले आहे.नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार प्रत्येक महाविद्यालयाचे नॅक (NAAC) मूल्यांकन होणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांना सर्वांगीण ज्ञानदानाच्या दृष्टीने महाविद्यालय भौतिक सोयी सुविधांनी सक्षम असायला हवे. महाविद्यालयातील प्राध्यापक शैक्षणिक पात्रता धारक असावा तसेच त्यांनी नवनव्या संशोधन क्षेत्रात संशोधन करायला हवे यासाठी नॅक मूल्यांकनास संस्थेने महत्व दिले आहे.
    धनेश्वरी कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात गेल्या पाच वर्षापासून ज्ञानदानाचे काम चालू आहे. या महाविद्यालयातील विद्यार्थी ग्रामीण व शहरी भागातील असून तो सर्वांगीण दृष्ट्या सर्व गुणसंपन्न असायला हवे म्हणून महाविद्यालयाने नॅक मूल्यांकन करण्याचे ठरवले आहे. महाविद्यालयास नॅक मूल्यांकन मूल्यमापनासाठी धनेश्वरी मानव विकास मंडळ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.वेदप्रकाश पाटील यांची प्रेरणा व मार्गदर्शन मिळत आहे.तसेच श्री धनेश्वरी शैक्षणिक संकुलाचे कार्यकारी संचालक डॉ. उदयसिंह पाटील,संस्थेचे सीईओ प्रा.आश्रुबा घाडगे आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भुईनवाड यांच्या मार्गदर्शनाखाली चालू शैक्षणिक वर्षात महाविद्यालयाचे नॅक मूल्यांकन होणार असून सर्व प्राध्यापक कर्मचाऱ्यांनी नॅक मूल्यांकन समिती पूर्ण तयारीने सामोरे जाण्याची तयारी ठेवा असे सुचवले आहे. या नॅक मूल्यांकन समितीस सामोरे जाण्यासाठी IQAC समितीचे प्रमुख म्हणून डॉ.भरत भोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.आजच नॅक मूल्यांकन समिती सामोरे जाण्यासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.वेदप्रकाश पाटील यांनी समन्वयसभा घेऊन सर्व कर्मचाऱ्यांना नॅक संदभनि मौलिक मार्गदर्शन केले आहे. याप्रसंगी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक कर्मचारी उपस्थित होते.
error: Content is protected !!