कळंब – नविन शैक्षणिक धोरणात पूर्व प्राथमिक शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.आंतरराष्ट्रीय दर्जाचा अभ्यासक्रम जो भारत आणि भारताबाहेरही वापरला जातो हेच शिक्षण किड झी प्रि-प्रायमरी स्कूल देत असल्याचे प्रतिपादन भैरवनाथ अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य सतिश मातने यांनी व्यक्त केले.ते कळंब येथील किडझी प्रि- प्रायमरी स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलन प्रसंगी बोलत होते. यावेळी दैनिक लोकमतचे उन्मेष पाटील,कळंब पत्रकार मंडळाचे अध्यक्ष धनंजय घोगरे, दैनिक लोकप्रभाचे तालूका प्रतिनिधी प्रदिप यादव व हॅलो धाराशिवचे संपादक संदिप कोकाटे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.यावेळी सुभाष वाघमारे व चंदा कुटे-वाघमारे या दांपत्याच्या मार्गदर्शनाखालील किड झी प्रि-प्रायमरी स्कूल कळंबच्या विद्यार्थ्यांनी विविध नृत्य आविष्कार सादर केले.
पुढे बोलताना मातने म्हणाले की, आज विद्यार्थ्यांपेक्षा पालकात स्पर्धा आहे मुलांना त्यांच्या आवडीप्रमाणे शिक्षण दिलं तर तो यशस्वी होतो म्हणून पालकांनी मुलांवर आपली आवड न लादता त्याच्या मनाप्रमाणे शिक्षण घेऊ द्यावे.यावेळी शिक्षक प्रदीप यादव यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी किड-झी सीनियर केजी विद्यार्थ्यांना डिग्री वितरण देखील करण्यात आले.या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार कु.निलिमा वाघमारे यांनी मानले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी
किड झी प्रि-प्रायमरीच्या सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले