धाराशिव शहर वाहतुक शाखा व संबंधीत पोलीस ठाण्यांनी महत्त्वाच्या रस्त्यांवर दि.13 डिसेंबर रोजी मोटार वाहन कायदा- नियम भंग प्रकरणी एकुण 176 कारवाया करुन 1,34,800 ₹‘तडजोड शुल्क’वसुल केले आहे.
“ अवैध मद्य विरोधी कारवाई.”
कळंब पोठाच्या पथकास आरोपी नामे -1)राणी शंकर काळे, वय 36 वर्षे, रा. इंदीरानगर,ता. कळंब जि. धाराशिव या दि.13.12.2023 रोजी 00.53 वा. सु. देवी मंदीर रोड कळंब येथे अंदाजे 2,940 ₹ किंमतीची 45लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये कळंब पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास आरोपी नामे 1)व्यंकटेश रामहारी माने, वय 34 वर्षे, रा. अनसुर्डा, ता. जि. धाराशिव हे दि.13.12.2023 रोजी 08.30 वा. सु. आपल्या राहात्या घराच्या पाठीमागे अंदाजे 6,720 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 96 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये बेंबळी पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
बेंबळी पोठाच्या पथकास आरोपी नामे 1)भास्कर दादाराव मस्के, वय 45 वर्षे, रा. केशेगाव ता. जि. धाराशिव हे दि.13.12.2023 रोजी 15.30 वा. सु. सांस्कृतीक सभागृहाचे बाजूचे पानअपरी मध्ये केशेगाव येथे अंदाजे 560 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 16 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या.यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये बेंबळी पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
उमरगा पोठाच्या पथकास आरोपी नामे 1)राजेंद्र पांडएुरंग कटकधोंड, वय 55 वर्षे, रा. बाहेर पेठ गुंजोटी, ता. उमरगा जि. धाराशिव हे दि.13.12.2023 रोजी 17.35 वा. सु. आपल्या राहात्या घरासमोर गुंजोटी ता. उमरगा येथे अंदाजे 3,000 ₹ किंमतीची 35 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये उमरगा पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
धाराशिव ग्रामीण पोठाच्या पथकास आरोपी नामे 1)सुरज रामचंद्र मुंढे, रा. पवारवाडी, ता. जि. धाराशिव हे दि.13.12.2023 रोजी 14.00 वा. सु. हॉटेल चैतन्य धाबा येथे अंदाजे 650 ₹ किंमतीची 9 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये धाराशिव ग्रामीण पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
“ मद्यपी चालकावर गुन्हा दाखल.”
येरमाळा पोलीस ठाणे : आरोपी नामे-1) तय्यब कादर शेख, वय 29 वर्षे, रा. नांदगाव, ता. वाशी जि. धाराशिव हे दि.13.12.2023 रोजी 17.40 वा. सु. आपल्या ताब्यातील मोटरसायकल क्र एमएच 25 ई 7620 ही रत्नापूर पाटीजवळ एनएच 52 रोडवर मद्यधुंद अवस्थेत चालवून मो.वा.का. कलम- 185 चे उल्लंघन केले. तर 2) सोमनाथ मदनराव पाटील, वय 30 वर्षे, रा. इंदापूर, ता. वाशी जि. धाराशिव हे दि.13.12.2023 रोजी 19.50 वा. सु. आपल्या ताब्यातील मोटरसायकल क्र एमएच 25 ए.एन. 1881 ही रत्नापूर पाटीजवळ एनएच 52 रोडवर मद्यधुंद अवस्थेत चालवून मो.वा.का. कलम- 185 चे उल्लंघन केले. तर 3) सुरेश बळवंत टेकाळे, वय 40 वर्षे, रा. रत्नापुर, ता. वाशी जि. धाराशिव हे दि.13.12.2023 रोजी 20.00 वा. सु. आपल्या ताब्यातील मोटरसायकल क्र एमएच 25 ए.एफ. 8317 ही रत्नापूर पाटीजवळ एनएच 52 रोडवर मद्यधुंद अवस्थेत चालवून मो.वा.का. कलम- 185 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द येरमाळा पो ठाणे येथे स्वतंत्र 3 गुन्हे नोंदवले आहेत.
“ बसस्थानक परिसरात आरडा ओरड करणाऱ्या मद्यपीवर गुन्हा दाखल.”
धाराशिव ग्रामीण पोलीस ठाणे :आरोपी नामे- अजय वसंत वाघमारे, वय 28 वर्षे, रा. समतानगर येडशी ता. जि. धाराशिव हे दि.13.12.2023 रोजी 14.00 वा सुमारास येडशी बसस्थानक परिसर येथे मद्यधुंद अवस्थेत आरडा ओरड करून गोंधळ घालताना धाराशिव ग्रामीण पो. ठा. च्या पथकास मिळून आला. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द म.द.का. कलम 85(1) अन्वये धाराशिव ग्रामीण पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
“ मालमत्तेविरुध्द गुन्हे.”
वाशी पोलीस ठाणे : फिर्यादी नामे-इम्रान हबीब शेख, वय 27 वर्षे, रा. मुन्शी प्लॉट उमरगा ता. उमरगा जि. धाराशिव हे साबरकांता गुजरात येथुन साबररोड लाईन्स मार्फत नंदेश्वरा ऑईल मिल नागरकरनुल येथे ट्रक क्र केए 56-4013 मध्ये 500 कट्टे शेंगदाणा बी भरुन जात असताना दि.27.11.2023 रोजी 05.30 वा. सु. सरमकुंडी फाटा ते इंदापुर कारखाना दरम्यान अज्ञात व्यक्तीने ट्रकची रस्सी कअ करुन ताडपत्री फाडुन आतील 18 कट्टे शेंगदाणा बी किंमत अंदाजे 1,08,000₹ किंमतीचा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-इम्रान शेख यांनी दि.13.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन वाशी पो. ठाणे येथे कलम 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“ शासकिय कामात अडथळा करणाऱ्यावर गुन्हा दाखल.”
धाराशिव शहर पोलीस ठाणे : आरोपी नामे- 1) अविनाश दिलीप भोसले, 2) सुग्रीव अंकुश पवार, 3) रवि अरलिंग्या पवार, 4) चमेली अविनाश भोसले सर्व रा.पाटोदा पाटी ह.मु. साठे नगर धाराशिव ता. जि. धाराशिव यांनी दि.13.12.2023 रोजी 10.15 वा. सु. साठेनगर धाराशिव ता. जि. धाराशिव येथे फिर्यादी नामे-हुसेन नसीर खॉन सय्यद, वय 37 वर्षे, व्यवसाय- पोलीस हावलदार /1166 नेमणुक- स्थानिक गुन्हे शाखा धाराशिव ता. जि. धाराशिव हे पोलीस स्टाफ सह नमुद आरोपी यांचे राहते घरी एमपीडीए आदेश पारीत करणेकामी गेले असता आरोपी नामे अविनाश भोसले यांनी स्वत:चे हाताने व चाकूने छातीवर, पोटावर वार करुन घेवून जखमी होवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. आरोपी नामे रवि, सुग्रीव व चमेली यांनी सदरचा आदेश पारीत करण्यास अटकाव करुन धक्काबुक्की करुन खोटी तक्रार करण्याची धमकी देवून सरकारी कामात अडथळा निर्माण केला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- हुसेन सय्यद यांनी दि.13.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव शहर पो. ठाणे येथे कलम 353, 309, 189, 506, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“ रस्ता अपघात.”
ढोकी पोलीस ठाणे : मयत नामे-सुशीलकुमार आण्णासाहेब शिंदे, वय 35 वर्षे, सोबत संदिप भिमराव शिंदे, वय 45 वर्षे, दोघे रा. वाखरवाडी, ता. जि. धाराशिव हे दि.03.12.2023 रोजी 18.30 वा. सु. इंडीयन ऑईल लातुर रोड ढोकी च्या समोरुन मोटरसायकल क्र एमएच 25 डब्ल्यु 0344 यावरुन जात होते. दरम्यान कुबोटा ट्रॅक्टर क्र एमएच 25 बीए 0146 चा चालक आरोपी नामे- किरण दत्तात्रय वाघमारे रा. बाभळगाव ता. कळंब जि. धाराशिव यांनी त्याचे ताब्यातील ट्रॅक्टर हा भरधाव वेगात, निष्काळजीपणे चालवून सुशीलकुमार शिंदे यांचे मोटरसायकलला धडक दिली. या आपघातात सुशीलकुमार शिंदे व संदीप शिंदे हे दोघे गंभीर जखमी होवून उपचार दरम्यान मयत झाले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- लालासाहेब गोविंद शिंदे, वय 51 वर्षे, रा. वाखरवाडी, ता. जि. धाराशिव यांनी दि.13.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 279, 337, 338, 304(अ) सह 184 मोवाका अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
ढोकी पोलीस ठाणे : मयत नामे-शिवाजी मारुती भोसले, वय 65 वर्षे, रा. हिंगहजवाडी, ता. जि. धाराशिव हे दि.13.10.2023 रोजी 14.00 वा. सु. टमटम क्र एमएच 25 एफ 1702 मधून तेर ते हिंगळजवाडी जाणाऱ्या रोडवरुन प्रवास करत होते. दरम्यान टमटम क्र एमएच 25 एफ 1702 च्या चालकाने त्याचे ताब्यातील टमटम हा भरधाव वेगात, निष्काळजीपणे चालवल्याने टमटम पलटी होवून आपघात झाला. या आपघातात मधील मयत नामे शिवाजी भोसले हे गंभीर जखमी होवून मयत झाले. तर इतर लोक हे किरकोळ जखमी झाले. अशा मजकुराच्या मयताचा मुलगा नामे- सतिश शिवाजी भोसले, वय 40 वर्षे, रा. हिंगळजवाडी, ता. जि. धाराशिव यांनी दि.13.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 279, 337, 338, 304(अ) सह 184 मोवाका अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
धाराशिव जिल्हृयाचे पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक श्री. गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा धाराशिवचे पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे यांना गुप्त बातमीदार मार्फत माहिती मिळाली की, पोलीस ठाणे उमरगा हद्दीतील गुंजोटी येथे जनावरांची अवैध कत्तल होत आहे यावरुन पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे यांचे आदेशावरुन सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. शैलेश पवार, पोलीस हावलदार- प्रकाश औताडे, विनोद जानराव, शौकत पठाण, पोलीस नाईक/ नितीन जाधवर, चालक पोलीस हावलदार- महेबुब अरब व QRT यांचे पथक हे दि.13.12.2023 रोजी 22.10 41पोलीस ठाणे उमरगा हद्दीतील गुंजोटी येथे कुरेशी गल्लीत अवैध कत्तल खान्यावर जनावरांची अवैध कत्तल होत आहे अशी खात्री लायक बातमी मिळाल्यावरुन पथकाने लागलीच त्याठिकाणी जावून छापा कारवाई केली असता सदर ठिकाणी काही इसम मिळून आले असता त्यांना त्यांचे नाव व पत्ता विचारले असता त्यांनी त्याचे नाव-1)असलम मोहम्मद कुरेशी, वय 34 वर्षे, 2) इम्रान जहीर कुरेशी, वय 25 वर्षे, 3) इरफान मजहर कुरेशी, वय 22 वर्षे तिघेही रा. दर्गा रोड कुरेशी गल्ली गुंजोटी ता. उमरगा जि. धाराशिव असे सागिंतले. त्याठिकाणी मिळून आलेल्या जनावरा बाबत त्यांचे कडे चौकशी केली त्यांनी सदर जनावरे ही कत्तली करीता आणल्याचे सागिंतले. सदर ठिकाणी अवैध कत्तल करण्याकरीता बांधलेले 06 बैल, 02 म्हैस, 08 रेडे, 02 रेडकु, 03 गोवंशीय वासरे व कत्तल केलेल्या जनावरांची 4 शिंगे अशी एकुण 5,26,000₹ किंमतीचे जनावरे हे नमुद आरोपीच्या ताब्यात मिळून आले ते जप्त करण्यात आले आहे. नमुद आरोपी यांचे विरुध्द उमरगा पोलीस ठाणे गुरनं 660/2023 महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 2015 कलम 5,5(ब) सह प्राण्याना निर्दयतेने वागवणे अधिनियम 1960 कलम 11 अन्वये गुन्हा दाखल आहे. तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे आणखी एका पथकातील पोलीस नाईक1611 बबन जाधवर व पोलीस अमंलदार 662/ नागनाथ गुरव हे दि. 13.12.2023 रोजी मालाविषयी गुन्हे करणाऱ्या आरोपीचा शोध घेण्यासाठी रवाना झाले असता सदर पथकास गोपनीय माहिती मिळाली की, आंबी पोलीस ठाणे येथे सन 2001 साली दाखल असलेल्या दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी नामे- तुकाराम उर्फ तुक्या सुर्यभान काळे रा. पांढरेवाडी ह.मु. फक्राबाद ता. जामखेड, जि. अहमदनगर हा पुन्हा आंबी पोलीस ठाणे हद्दीत आल्याची गुप्त माहिती मिळाल्यावरुन पथकाने सापळा रचून नमुद आरोपीस ताब्यात घेवून आंबी पोलीस ठाणे येथे हजर केले. नमुद आरोपी हा गेल्या 22 वर्षा पासून वॉन्टेड आरोपी होता.
सदर कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक श्री. गौहर हसन, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. वासुदेव मोरे, सपोनि श्री. शैलेश पवार, पोलीस हावलदार- प्रकाश औताडे, विनोद जानराव, शौकत पठाण, पोलीस नाईक/ नितीन जाधवर, चालक पोलीस हावलदार- महेबुब अरब, QRT पथक, पोलीस नाईक- बबन जाधवर व पोलीस अमंलदार – नागनाथ गुरव यांच्या पथकाने केली.
More Stories
निवडणुकीत ७ लक्ष ४७ हजार ३७० मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क
इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या पुरस्काराकरिता अर्ज करण्याचे आवाहन
मतदानाचा हक्क बजावण्यासाठी कामगारांना ७ फेब्रुवारी रोजी भरपगारी रजा देणे बंधनकारक