August 9, 2025

गुरव व लिंगायत समाजासाठी आर्थिक विकास महामंडळांची स्थापना

  • धाराशिव (जिमाका) – महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाकडे संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ व जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाचा शासन निर्णय 9 ऑगस्ट 2023 नुसार गुरव व लिंगायत समाजासाठी स्थापना झाली आहे.
    या दोन्ही महामंडळाचे कामकाज महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाकडे कार्यान्वीत करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी या समाजातील बांधवांनी महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्यादीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीजवळ, छ.संभाजीनगर रोड, धाराशिव (दूरध्वनी क्रमांक 02472-223833) येथे संपर्क साधावा.असे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक पी.सी.पोहरे यांनी केले आहे.
error: Content is protected !!