लातूर – लातूर शहरातील सिद्धांत नगर,खाडगांव रोड येथे विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त लोकसहभागातून उभारण्यात आलेल्या भव्य डिजिटल कमान,नामफलक तसेच CCTV कॅमेऱ्यांचे लोकार्पन मोठ्या उत्साहात व थाटामाटात पार पडले.हा सोहळा दि.१० एप्रिल २०२६ रोजी शुक्रवारी रात्री संपन्न झाला. या कार्यक्रमाला सिद्धांत नगरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
परिसरात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फय्याज भाई शेख होते.यावेळी प्रभाग क्रमांक १४ मधील नगरसेविका करूणा शिंदे,अतिश चिकटे,आयुब मनियार,साधुभाऊ गायकवाड,पंकज काटे,सचिन गायकवाड,विनय जागते,सिद्धार्थ कवटेकर,अजय सूर्यवंशी, विष्णुपंत साठे,बाबा कांबळे,सुफी सय्यद,लालाभाऊ सुरवसे, उषाताई धावारे,सुरेखा भालेराव तसेच नवाज शेख यांच्यासह अनेक मान्यवर व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत डिजिटल कमान व CCTV कॅमेऱ्यांचे लोकार्पन करण्यात आले.या उपक्रमामुळे परिसराच्या सौंदर्यात भर पडण्याबरोबरच सुरक्षेच्या दृष्टीनेही मोठी मदत होणार असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. या कार्यक्रमाचे आयोजन जयंती समितीचे अध्यक्ष गौस बागवान, बाबासाहेब गायकवाड,साहेबराव गायकवाड,मिलिंद सोनवने,महादू गायकवाड,आलम शेख,विवेक सोनवने,बाबुराव सोनवने,मधुकर सोनवने,प्रविण गायकवाड,सिद्धांत सोनवने,अनुराग सोनवने, विशाल सोनवने,संकेत सोनवने,इमरान बागवान,अनंत सोनवने व अनिल लांडगे यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बौद्धाचार्य बी.आर.ढगे यांनी केले,तर उपस्थित मान्यवरांचे आभार नगरसेविका करूणा शिंदे यांनी मानले. सिद्धांत नगरातील सर्व नागरिकांच्या सहकार्याने हा लोकार्पन सोहळा यशस्वीरीत्या पार पडला.
More Stories
समता,शिक्षण आणि न्यायाचा दीप प्रज्वलित – मोहेकर महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी
विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी रूढी-परंपरांना छेद देत शिक्षणातून समतेचा मार्ग दाखविला – सोपान पवार
कळंबमध्ये ‘काव्य मैफिल’ व विज्ञानाधारित चमत्कार सादरीकरण;अंधश्रद्धेविरुद्ध जनजागृतीचा उपक्रम