कळंब– विद्याभवन हायस्कूल कळंब येथे विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आयोजित सामाजिक समता कार्यक्रमांतर्गत साहित्यिक सोपान पवार यांचे प्रेरणादायी व्याख्यान उत्साहात पार पडले. या कार्यक्रमात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे महत्त्व तसेच महाड चवदार तळे सत्याग्रह शताब्दी वर्षाचे औचित्य अधोरेखित करण्यात आले.ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळाचे सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने तसेच मुख्याध्यापक व्यंकट कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक कुंभार व्ही.जी. होते.यावेळी उपमुख्याध्यापक मयाचारी व्ही.एस.,पर्यवेक्षक श्रीमती कोळी जे.एन. तसेच शिक्षकवृंद उपस्थित होते. यावेळी बोलताना सोपान पवार म्हणाले, “विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी रूढी-परंपरांना छेद देत शिक्षणाच्या माध्यमातून समतेचा मार्ग दाखविला.” त्यांनी पुढे आंबेडकरांच्या विचारांची उपयुक्तता स्पष्ट करत विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या जोरावर स्वतःचा आणि समाजाचा विकास साधावा,असे आवाहन केले. तसेच महाड चवदार तळे सत्याग्रह हा मानवी हक्क आणि आत्मसन्मानासाठी लढलेला ऐतिहासिक संघर्ष असल्याचे त्यांनी नमूद केले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांसाठी निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमास प्रशालेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
More Stories
कळंबमध्ये ‘काव्य मैफिल’ व विज्ञानाधारित चमत्कार सादरीकरण;अंधश्रद्धेविरुद्ध जनजागृतीचा उपक्रम
आंबेडकरी विचारांचा प्रभाव; कुणाल जगतापची सैनिक स्कूल साताऱ्यात झेप
कौशल्याधिष्ठित शिक्षण हीच काळाची गरज – डॉ.अशोकराव मोहेकर