कळंब – जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापतीपदी पूजा तुषार शिंदे यांची निवड झाल्याबद्दल धाराशिव शिवसेना परिवाराच्या वतीने त्यांचा पुष्पगुच्छ देऊन भव्य सत्कार करण्यात आला.या निवडीमुळे कळंब तालुक्याला जिल्हा परिषदेत महत्त्वाचे प्रतिनिधित्व मिळाले असून शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. यावेळी एकनाथ शिंदे,धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक, माजी खासदार रवींद्र गायकवाड, शिवसेना संपर्कप्रमुख राजन साळवी तसेच माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी पूजा शिंदे यांच्या रूपाने सक्षम व कार्यक्षम नेतृत्वाला संधी दिल्याबद्दल समाधान व्यक्त केले. कळंब तालुक्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी या निवडीबद्दल वरिष्ठ नेत्यांचे आभार मानत,पूजा शिंदे या महिला व बालकांच्या सक्षमीकरणासाठी जिल्ह्यात प्रभावीपणे काम करतील,असा ठाम विश्वास व्यक्त केला.ग्रामीण भागातील महिला सबलीकरण, बालकांच्या आरोग्य व शिक्षणाशी संबंधित प्रश्न सोडविण्यावर त्यांचा विशेष भर राहील,अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली. या सत्कार सोहळ्याला शिवसेना जिल्हाप्रमुख अजित पिंगळे, जिल्हा परिषद सदस्य अनंत लंगडे,कळंब पंचायत समिती सभापती राजश्रीताई वरपे, उपजिल्हाप्रमुख अनंत वाघमारे, तालुकाप्रमुख लक्ष्मीकांत हुलजुते, तुषार शिंदे,नारायण टेकाळे यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या निवडीमुळे कळंब तालुक्याच्या राजकीय व सामाजिक क्षेत्रात नवे नेतृत्व पुढे येत असल्याचे चित्र दिसत असून,आगामी काळात जिल्हा परिषद स्तरावर ठोस कामगिरीची अपेक्षा व्यक्त होत आहे.
More Stories
जिल्ह्यातील एकही कुटुंब महिला बचत गटापासून वंचित राहू नये – जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार
धाराशिव जिल्हा परिषदेत ‘सरप्राईज’ निकाल;कळंब तालुक्याची लॉटरी – दोन सभापती पदांवर झेंडा!
ई-पीक पाहणीची अंतिम मुदत ३१ मार्चपर्यंत;शेतकऱ्यांनी तात्काळ नोंदणी करून घ्यावी