कळंब– निजाम काळातील पारतंत्र्याच्या अंधारातही बहुजन समाजाच्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश फुलवण्याचा निर्धार ज्यांनी केला,त्या शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या दूरदृष्टीतून उभी राहिलेली “ज्ञान प्रसारक मंडळ,येरमाळा” ही संस्था आजही समाजपरिवर्तनाचा दीपस्तंभ ठरत आहे.
“ज्ञान दीप लावू जगी”या संत नामदेवांच्या विचारांना कृतीत उतरवत,१९५१ साली मोहा येथे सुरू झालेली ही चळवळ आज मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यात शिक्षणाची गंगा वाहत आहे. बहुजन समाजातील वंचित घटकांना दर्जेदार,सक्षम व परिवर्तनशील शिक्षण मिळावे,त्यांच्या जीवनात समृद्धीची पहाट यावी या उदात्त ध्येयातून सुरू झालेल्या या संस्थेने काळाच्या ओघात अनेक विद्यालये,महाविद्यालये व उच्च शिक्षणाची केंद्रे उभी करून हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल केले आहे. आजच्या आधुनिक युगातही या संस्थेची वाटचाल तितक्याच जोमाने सुरू असून कर्तव्यदक्ष सचिव मा.डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या सक्षम व दूरदृष्टीपूर्ण मार्गदर्शनाखाली २१ व्या शतकातील गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचे कार्य उल्लेखनीय ठरत आहे. याच प्रेरणेतून शिक्षण महर्षींच्या स्वप्नपूर्तीसाठी कर्तव्यदक्ष सचिव मा.डॉ.अशोकराव मोहेकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली निर्भीड व अभ्यासू व्यक्तिमत्व असलेले मुख्य संपादक सुभाष द.घोडके यांच्या लेखणीतून साकारलेले साप्ताहिक ‘साक्षी पावनज्योत’ हे वृत्तपत्र दि.१५ ऑगस्ट २०१६ पासून समाजजागृतीचे प्रभावी माध्यम ठरत आहे.
मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या पवित्र निमित्ताने दि.१९ मार्च २०२६ रोजी शहरातील शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयात कार्यकारी संपादक अविनाश घोडके यांनी मा.डॉ.अशोकराव मोहेकर साहेब यांची भेट घेतली.तसेच घोडके यांनी आपल्या कार्यातील विविध अडचणी व भेडसावणाऱ्या समस्यांची मांडणी केल्यानंतर मा. डॉ.अशोकराव मोहेकर साहेब यांनी त्यावर अत्यंत अभ्यासपूर्ण तोडगा सुचवत सकारात्मक व परिणामकारक मार्ग दाखविला. या प्रसंगी शिक्षक चळवळीत सक्रिय भूमिका बजावणारे महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष राजाभाऊ शिंदे सर,प्रा.नामानंद साठे तसेच सहशिक्षक कमलाकर शेवाळे यांचीही उपस्थिती लाभली. ज्ञानाच्या ज्योतीतून समाजप्रबोधनाची अखंड परंपरा जपत,परिवर्तनाचा दीप सतत प्रज्वलित ठेवण्याचे कार्य ‘ज्ञान प्रसारक मंडळ,येरमाळा’ करत असून,हीच परंपरा आगामी काळात अधिक तेजाने उजळत राहील,असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
More Stories
“स्मार्ट मीटरची गुढी” उभारून महावितरणविरोधात संतापाचा स्फोट;४५०० ग्राहक अंधारात!
सभापती राजश्री वरपे यांचा सन्मान; ‘साक्षी पावनज्योत’ अंकाचे सप्रेम प्रदान
विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाचे नियोजन;कार्यकारिणी जाहीर