कळंब – कळंब पंचायत समितीच्या नवनियुक्त सभापती राजश्री वरपे यांचा सन्मान करत त्यांना साप्ताहिक ‘साक्षी पावनज्योत’ चा अंक सप्रेम भेट देण्यात आला. दि.१७ मार्च २०२६ रोजी मंगळवारी पंचायत समिती, कळंब येथील कार्यालयात हा कार्यक्रम संपन्न झाला. बहुजनांच्या न्याय व हक्कांसाठी आवाज उठवणारे तसेच शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या स्वप्नपूर्तीसाठी प्रकाशित होत असलेले ‘साक्षी पावनज्योत’ हे साप्ताहिक ज्ञान प्रसारक मंडळ, येरमाळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ. अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने सुरू असून निर्भीड व अभ्यासू व्यक्तिमत्व असलेले मुख्य संपादक सुभाष द.घोडके यांच्या लेखणीने ते साकारले आहे. यावेळी कार्यकारी संपादक अविनाश घोडके यांच्या हस्ते सभापती राजश्री वरपे यांना साप्ताहिकाचा अंक भेट देण्यात आला.सभापती पदावर नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून त्यांच्या भावी वाटचालीस मंगलमय शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या. या प्रसंगी उत्कर्ष घोडके यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.कार्यक्रमात सामाजिक, शैक्षणिक व पत्रकारितेच्या माध्यमातून समाजहिताचे कार्य अधिक बळकट करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
More Stories
“आरक्षणावर उपवर्गीकरणाचा घाव चालणार नाही” कळंबमध्ये ४ मे रोजी भव्य मोर्चाची हाक
भोसा गावातील विद्यार्थ्यांची एस.टी.बससाठी हाक; शिक्षणासाठी प्रवासाचा मोठा प्रश्न ऐरणीवर
समता,शिक्षण आणि न्यायाचा दीप प्रज्वलित – मोहेकर महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी