कळंब–विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेत नवनवीन व नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून पालकांचा शाळेकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन निर्माण केला पाहिजे.पालकांचा विश्वास संपादन करून शाळेची गुणवत्ता वाढविणे आणि प्रवेशसंख्या वाढविणे ही आजच्या काळाची गरज आहे.शिक्षकांनी एकत्रितपणे प्रयत्न केल्यास मराठी शाळांचे अस्तित्व अधिक बळकट होईल आणि विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिर या शाळेचे नाव पुढील काळात निश्चितच गाजेल,असे प्रतिपादन ज्ञान प्रसारक मंडळ,येरमाळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांनी केले. दि.१७ मार्च २०२६ रोजी कळंब शहरातील विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिर येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीच्या प्रारंभी संस्थापक अध्यक्ष शिक्षण महर्षी कैलासवासी ज्ञानदेव मोहेकर गुरुजी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक सुभाष लाटे यांनीही शाळेतील भौतिक सुविधा अधिक सक्षम करून विद्यार्थ्यांसाठी आकर्षक वातावरण निर्माण करण्याचे आवाहन केले.तसेच सर्व शिक्षकांनी एकजुटीने प्रयत्न करून आगामी प्रवेश प्रक्रियेत शाळेचा उच्चांक गाठण्याचा संकल्प केला पाहिजे,असे त्यांनी सांगितले. याच बैठकीदरम्यान मुख्याध्यापक सुभाष लाटे यांच्या हस्ते कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. या बैठकीस ज्ञान प्रसारक मंडळाचे सहसचिव भागवत गव्हाणे यांच्यासह सहशिक्षिका लोहियाबाई काळवे,सविता लाखे, सुरेखा गव्हाणे,सुवर्णा सगरे, सुजिता वाघमारे,सरोज तवटेवाड, सुनीता सुतार तसेच सहशिक्षक गोविंद कल्याणकर,अंगद मिटकरी,विजयानंद तांबारे, विश्वास मोरे,बालाजी वाघमारे, दयानंद बन,महेंद्र जगताप, किरणकुमार मुंडे,दत्तात्रय वळेकर आदी शिक्षकांची उपस्थिती होती. बैठकीत शाळेच्या प्रवेशवाढीबाबत विविध उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली.विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक गुणवत्ता,सांस्कृतिक उपक्रम, क्रीडा स्पर्धा व सामाजिक जाणीव निर्माण करणारे कार्यक्रम राबवून शाळेची ओळख अधिक दृढ करण्याचा निर्धार उपस्थित शिक्षकांनी व्यक्त केला.
More Stories
दादर रेल्वे स्थानकाला ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर चैत्यभूमी’ नाव देण्याची मागणी; कळंब येथे लोजपा (रामविलास)चे धरणे आंदोलन
मच्छिंद्र दादा गायकवाड युवा प्रतिष्ठानची भीम जयंतीसाठी जय्यत तयारी;नियोजन बैठकीत कार्यकारिणीची निवड
वातावरणातील बदलामुळे आंबा बागांचे मोठे नुकसान;पंचनामे करून तात्काळ भरपाईची शेतकऱ्यांची मागणी